अशी मिळावा चेहऱ्यावरील नको असलेल्या केसांपासून सुटका

Wednesday, October 3, 2018
 
आपल्या  चेहऱ्यावर नको असलेले अधिक केस असतील, तर त्यामुळे तुमचे सौंदर्य फिके वाटत असेल. ही समस्या तुमचा आत्मविश्वासही कमी करू शकते. घाबरू नका, ही समस्या अनेकांना असते आणि त्यावर साधे-सोपे उपायही आहेत.ही समस्या उद्भवते ती तणावामुळे. काही वेळा ही समस्या अनुवंशिक असते, तर काही वेळा असंतुलित हॉर्मोन्समुळेही चेहऱ्यावर केस दिसून येतात.

यासाठी तुम्ही अनेकदा ब्लीच केले, तर चेहऱ्यावरचं खरंखुरं तेज निघून जाऊ शकतं, शिवाय नेहमी नेहमी थ्रेडिंग किंवा वॅक्सिंग करणंही शक्य नसतं. अशा वेळी काही घरगुती उपाय करून तुम्ही या समस्येपासून मुक्ती मिळवू शकता. 

टोमॅटोचा रस :
याशिवाय तुम्ही दररोज जेवणात वापरत असलेला टोमॅटोही चेहऱ्यासाठी वापरू शकता. टोमॅटो थोडा कापून किंवा त्याची पेस्ट बनवून त्याने चेहऱ्याला थोडा वेळ मसाज करा. पेस्ट थोडा वेळ लावून ठेवा आणि त्यानंतर चेहरा पाण्याने धुवा.

संत्र्याची साल आणि दह्याची पेस्ट : 
संत्र्याची साल त्वचेसाठी खूप फायदेशीर ठरते. याच्या वापरामुळे चेहरा तजेलदार दिसतो. सोबतच चेहऱ्यावर दिसणारे केसही विरळ होत जातात. जर तुम्हाला आणखी परिणामकारक उपाय हवा असेल, तर संत्र्याच्या सालीत दही आणि लिंबाच्या रसाचे काही थेंब टाकून ही पेस्ट दररोज चेहऱ्याला लावा. यामुळे तुमची पिंपल्सपासूनही सुटका होईल. .

पपई आणि .हळदीची पेस्ट : 
पपई एक नॅचरल ब्लीच आहे. याच्या वापराने चेहऱ्याचा रंग उजळतोच, पण चेहऱ्यावरील नको असलेल्या केसांचा रंगही हलका होऊन जातो. तुम्हाला हवे असल्यास पपईत थोडी हळद मिसळून ही पेस्ट दररोज चेहऱ्याला लावू शकता. ही पेस्ट वापरताना थोडा वेळ पेस्टने चेहऱ्याला मसाज करा आणि त्यानंतर १५-२० मिनिटे ही पेस्ट चेहऱ्यावर तशीच ठेवा आणि मग चेहरा पाण्यानं धुवा. परिणाम तुम्हाला दिसून येईल..

लिंबाचा रस आणि मध:-
चेहऱ्यावरच्या केसांचा रंग हलका करण्यासाठी आणि चेहरा तजेलदार बनविण्यासाठी मध आणि लिंबाचा रस मिसळून चेहऱ्याला लावा. रोज हे मिश्रण कमीत कमी १० मिनिटांपर्यंत चेहऱ्यावर लावून ठेवा. काही दिवसांतच तुम्हाला याचा परिणाम लक्षात येईल. 

No comments:

Post a Comment