मराठवाडा व्यापारी महासंघाच्या मिसकॉल अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद

Saturday, September 29, 2018


लातूर : केंद्र सरकारने परकीय थेट गुंतवणुकी संदर्भात स्वीकारलेल्या धोरणाचा निषेध करण्यासाठी मराठवाडा व्यापारी महासंघाच्यावतीने मिसकॉल अभियान राबविण्यात आले या अभियानात सहभागी होत हजारो व्यापाऱ्यांनी मिसकॉल देत केंद्र शासनाच्या धोरणाचा विरोध नोंदवला . 

चेंबर ऑफ ऑल इंडिया महाराष्ट्र इंडस्ट्री ॲन्ड ट्रेडचे अध्यक्ष मोहन गुरूनाणी व अध्यक्ष दिपेन अग्रवाल यांच्या आदेशावरून दि. २८ सप्टेंबर रोजी भारत व्यापार बंद करण्यात आला .. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मराठवाडा व्यापारी महासंघाने मिसकॉल अभियान राबविण्याचा निर्णय घेतलाहोता . त्यासाठी व्यापार्‍यांनी ९८२२०३३५०० या क्रमांकावर मिसकॉल द्यावा असे आवाहन मराठवाडा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष दिनेश गिल्डा यांनी केले होते या आवाहनाला प्रतिसाद देत हजारो व्यापाऱ्यांनी मिसकॉल देवून शासनाच्या धोरणाचा निषेध केला यासंदर्भात जिल्हाशिकाऱ्यांना निवेदनही देण्यात आले .

रिटेलमध्ये परदेशी गुंतवणूकीला परवानगी देवू नये ,रिटेल व्यापारात परदेशी गुंतवणुकीला दिलेली शंभर टक्के परवानगी मागे घ्यावी ,ई कॉमर्स धोरण तात्काळआगे घ्यावे ,जी एस टी मध्ये दोनच प्रकारचे दर असावे ,व्यापाऱ्यांना केला जाणारा कसलाही कर दहा हजार रुपयांपेक्षा अधिक असू नये ,उत्तरप्रदेश प्रमाणे व्यापाऱ्यांचा दहा लाख रुपयांचा दुर्घटना विमा काढावा ,पाच लाख रुपयापर्यंतचे उत्पन्न आयकर मुक्त करावे व्यापाऱ्यांना निवृत्तीवेतन द्यावे आदी मागण्यांचा निवेदनात समावेश आहे .

निवेदन देताना मराठवाडा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष दिनेश गिल्डा, धिरज तिवारी, संजय काथवटे, रईस टाके,बसवराज मंगरुळे , विशाल खंडेलवाल, विजय पारीख, दिनेश ब्रिजवासी,संजय हत्ते राजेश फडकुले , दगडू लांडगे ,रामेश्वर पुनपाळे नागेशअप्पा बावगे ,यशवंत रांजणकर आदींची उपस्थिती होती .

No comments:

Post a Comment