क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत महात्मा फुले हायस्कूलने मारली बाजी

Sunday, September 30, 2018


नांदेड दि. 
श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचालित, महात्मा फुले हायस्कूल बाबानगर-विजयनगरने नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा व विभागीय पातळीवरील हॉलिबॉल, जलतरण, वुशू, टेबल टेनिस या क्रीडास्पर्धेत तर जिल्हास्तरीय निबंधस्पर्धेत नेत्रदीपक यश संपादन करून शाळेचे नाव उज्ज्वल केले.

या यशवंतांचा गौरव सोहळा संस्थेचे सचिव माजी मंत्री आ. डी.पी. सावंत यांच्या शुभहस्ते आयटीएम सभागृहात संपन्न झाला. याप्रसंगी संस्थेचे सहसचिव ऍड. उदयरावजी निंबाळकर, खजिनदार गंगाधररावजी शक्करवार, मुख्याध्यापक व्ही.एस. पाटील, उपमुअ. पी.आर. कानडे, प्रवक्ते संतोष पांडागळे, सांस्कृतिक विभागप्रमुख संतोष देवराये, क्रीडा विभागाचे रघुनाथ कऊटकर आदी उपस्थित होते.

हॉलिबॉलमध्ये अंडर 14 व 17 या दोन्ही गटात शाळेच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावला. जिल्हास्तरीय निबंधस्पर्धेत विजयनगर विभागातील आदित्य संतोष देवराये याने प्रथम तर गजानन जगदंबे यांनी द्वितीय क्रमांक पटकावला. विभागीय जलतरण स्पर्धेत दीक्षांत खंदारे, विशाल सोनकांबळे, वैभव शिंगटे यांनी प्रथम क्रमांक मिळविला. वुशू या क्रीडा प्रकारात कु. लविशा पाटील, सुमित नवघडे यांनी प्रथम क्रमांक पटकावला. टेबल टेनिसमध्ये कु. आशुजा पवार, कु. शीतल गायकवाड, कु. कोमल एडके यांच्या संघाने प्रथम क्रमांक मिळविला. प्रशालेच्या साईनाथ कोरडे या विद्यार्थ्याने हॉलिबॉलमध्ये राष्ट्रीय पातळीवर संघाचे नेतृत्व केले. या सर्व गुणवंतांचा गौरव करून त्यांना राज्यस्तरीय स्पर्धेसाठी आ. डी.पी. सावंत यांनी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांच्या क्रीडा व सांस्कृतिक विकासासाठी संस्था सर्वोतोपरी सहकार्य करेल, असेही ते शेवटी म्हणाले. गुणवंतांचे शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.

No comments:

Post a Comment