मुंबई दि
सहकार क्षेत्रांत सातत्यपूर्ण गुणवत्तापूर्ण प्रणालीने कार्य करणाऱ्या गोदावरी अर्बनने अत्यंत प्रतिष्ठेचा समजला जाणारा राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचा मल्टिस्टेट विभागातून प्रथम 'दिपस्तंभ' पूरस्कारावर मोहोर उमटून आपल्या शिरपेचात मनाचा तुरा खोवला.
महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन व सहकार विकास महामंडळाच्या वतीने नुकतेच लोणावळा येथे झालेल्या दिमाखदार सोहळ्यात राज्याचे सहकार मंत्री ना.सुभाष देशमुख, राज्य सहकार परिषद अध्यक्ष ना.शेखर चरेगांवकर, राज्य फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे यांच्या शुभहस्ते गोदावरी अर्बनचे व्यवस्थापकीय संचालक धनंजय तांबेकर यांना,लोणावळा येथे देण्यात आला. तसेच पंडित दीनदयाल सहकारी पतसंस्था ठेव सुरक्षा योजनेचा शुभारंभ देखील सहकार मंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाचे एम.डी. मिलिंद आखरे, सहकार आयुक्त एस.के.सोनी, कार्याध्यक्ष राजूदास जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
सहकार क्षेत्रांत गोदावरी अर्बनने अत्यंत कमी कालावधीत नेत्रदीपक कामगिरी केल्याबद्दल आजपर्यंत अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
गोदावरी अर्बनचे कामकाज संगणकीय व ऑनलाईन पद्धतीने चालते येथील सर्व कर्मचारी उच्च विद्याविभूषित आहेत प्रत्येक शाखा हि अद्यावत सुविधेने संपन्न आहे. ही एक संस्था नसून हा एक परिवार आहे या भावनेने येथील प्रत्येक कर्मचारी आपल्या कामाचे योगदान देत असतो. हा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल संस्थापक अध्यक्ष आमदार हेमंत पाटील यांनी सर्व श्रेय गोदावरी परिवारातील समर्पित भावनेने काम करणाऱ्या दैनिक अभिकर्ता,कर्मचारी ठेवीदार, हितचिंतक यांचे असल्याचे सांगितले. अध्यक्ष राजश्री पाटील यांनी या पुरस्काराचे श्रेय व्यवस्थापकीय संचालक धनंजय तांबेकर यांच्या शिस्तबद्ध कार्यपद्धतीला तसेच सभासद, ठेवीदार, ग्राहक व उच्च प्रशिक्षित कर्मचारी वृंदाना जाते. यावेळी प्रशासकीय अधिकारी सुरेखा दवे, लेखाधिकारी विजय शिरमेवार, सर्वश्री व्यवस्थापक गिरीश अष्टोनकर, धनंजय क्षिरसागर, प्रशांत शंखपाळ, अमित पिंपळकर, दिपक औसरमल, सचिन अग्रवाल, शिवराज वल्लेवाड यांच्यासह सहकार क्षेत्रातील अनेक दिग्गजांची प्रमुख उपस्थिती होती.

No comments:
Post a Comment