लातूर प्रतिनिधी:
सरस्वती कॉलनी, लातूर येथे प्रमोद मुंदडा यांनी गोल्ड जिमची सुरुवात केली आहे.माजी राज्यमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी सोमवार (दि.३) रोजी जिमला सदिच्छा भेट देऊन जिममधील अत्याधुनिक उपकरणांची माहिती करुन घेतली. गोल्ड जिमच्या माध्यमातून लातूकरांचे आरोग्य सदृढ होण्यास मदत होईल अशा शब्दात उपक्रमाचे कौतूक केले.
यावेळी गोल्ड जिमचे संचालक प्रमोद मुंदडा, बालकिशन मुंदडा, बालाप्रसाद बिदादा, चार्टर्ड अकाउंट प्रकाश कासट, श्रीशैल्य उटगे, इमरान सय्यद, संजय ओहळ, सुपर्ण जगताप, व्यंकटेश पुरी, आकाश मुंदडा, अक्षयमुंदडा आदींची उपस्थिती होती.

No comments:
Post a Comment