विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच सामाजिक व व्यवहारिक ज्ञानाचे धडे दयावेत -खा. अशोक चव्हाण

Saturday, September 29, 2018

भोकर 
शिक्षकांनी विद्यार्थ्यांना पुस्तकातील धडे देण्यासोबतच सशक्त भारत होण्यासाठी सामाजिक व व्यवहारीक जाण शिकवावी असे आवाहन खा.अशोक चव्हाण यांनी केले.पंचायत समिती कार्यालयाच्या वतीने आज ( ता २८ ) बायपास रोडवरील ओमलॉंन्स येथे , तालुक्यातील गुणवंत शिक्षकांचा तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा अयोजीत करण्यात आला होता याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बोलत होते. 

यावेळी मंचावर आमदार अमिताताई चव्हाण, जि.प.आध्यक्षा शांताबाई पवार पा.जवळगावकर, शिक्षण समिती सभापती माधवराव मिसाळे गुरुजी , सभापती जगदीश पाटील भोसीकर ,जि प सदयस्य बाळासाहेब पाटील रावनगावकर , प्रकाश देशमुख भोसीकर, दिवाकर रेड्डी सुंकुरवड . तहसीलदार व्यंकटेश मुंढे , वनक्षेत्र अधिकारी आशिष हिवरे , सभापती झिम्माबाई चव्हाण ,गटविकास अधिकारी गंगाधर रामोड, जिल्हा क्रिडा अधिकारी राजेश मारावार , तालुका क्रिडा अधिकारी साजेद शेख ,आदि मान्यवरांची प्रमुख ऊपस्थिती होती कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पुजन करून कार्यक्रमाचे उद्घघाटन करण्यात आले. येथे स्वागताचे सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर तालुक्यातील गुणवंत आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा खा.आशोक चव्हाण यांच्या हस्ते सपत्नीक शाल , श्रीफळ, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

पुढे बोलताना चव्हाण म्हणाले की शिक्षकांना आता काय शिकवावे असा प्रश्न निर्माण झाला आहे दुरदैवाने महात्मा गांधीचे नाव सुध्दा पुस्तका तुन नाव हद् पार करण्याचा ठाव कांही शक्ती करित आहेत अशा परिस्थीतीत महात्माचे अनुकरण तत्व शिकवले तर निश्चितच भावी पिढी घडेल असेही अवाहन या प्रसंगी शिक्षकांना केले. जि.प शिक्षण सभापती माधवराव मिसाळे , प्रकाश भोसीकर , सुभाष पाटील कोळगावकर आदिंनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त करून शिक्षकांना शुभेच्छा प्रदान केल्या कार्यक्रमाच्या वेळी असंख्य शिक्षक , मुख्याध्यापक व शिक्षण प्रेमी नागरिक मोठ्या संख्येने ऊपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक गंगाधर रामोड यांनी केले तर सुरेख सुत्रसंचलन श्रीकांत गोरशेटवार , राज्य पुरस्कारप्राप्त शिक्षक हनंमत जाधव यांनी केले शेवटी आभार आर एल मुधोळकर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वितेसाठी पंचायत समिती शिक्षण विभागाचे विस्तार आधिकारी आर.एल. मुधोळकर, डी.डी. सुपे, एम.जी. वाघमारे, सर्व केंद्रप्रमुख, केंद्रिय मुख्याध्यापक, कार्यालयीन कर्मचारी शेख साहेब, लक्षूमण सुरकार ,महम्मद फजल, शिवाजी हाके,ओंकार पांचाळ, नरसिंग जिङ्डेवार, सुधांशु कांबळे, डेव्हिड ग्रॅहम्बल, अमोल नरवाडे, संतोषी पतूलवार, गजानन खुपसे, अनिता गिरी अर्दिनी प्रयत्न केले

No comments:

Post a Comment