![]() |
| संग्रहित |
नवी दिल्ली :एकीकडे काँग्रेससह सर्व विरोधी पक्ष राफेल मुद्द्यावरून केंद्र सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करीत असताना सरकार आणखी 114 लढाऊ विमाने खरेदी करणार आहे .यासाठी 20 अब्ज डॉलर म्हणजेच १ .४ लाख कोटी रुपये खर्च करण्याची सरकारची तयारी आहे .
मोदी सरकारने फ्रान्समधील डसॉल्ट या कंपनीसोबत करार करून विमानांच्या खरेदीसाठी 59 हजार कोटी रुपये देण्याची तयारी दर्शवली .काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी मात्र या विमानांसाठी सरकारने अधिक पैसे मोजल्याचा आरोप करीत आहेत .या प्रकरणात केंद्र सरकारला चोहोबाजूंनी घेरण्यात आले आहे .
या स्थितीत संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली असणाऱ्या सुरक्षा अधिग्रहण परिषदेने सप्टेंबर अखेर किंवा ऑक्टोबरच्या प्रारंभी विमान खरेदीच्या प्रस्तावाला मंजुरी देण्याचे निश्चित केले आहे. या करारानुसार पुढील तीन ते पाच वर्षांत भारतीय सैन्याला 18 नवीन लढाऊ विमाने मिळणार असून मेक इन इंडिया अंतर्गत उर्वरित विमानांची निर्मिती भारतातच केली जाणार आहे .भारतीय सैन्य युद्धसज्ज करण्यासाठी हा करार अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.
या कराराच्या अंतर्गत रशियाकडून सुखोई-35 विमानं खरेदी करण्यात येतील. यासोबतच एफ/ए-18, एफ-16 (अमेरिका), ग्रिपेन-ई (स्वीडन), मिग-35 (रशिया), युरोफायटर टायफून ही विमानं भारताकडून खरेदी केली जाऊ शकतात. या विमानांनी भारतीय संरक्षण मंत्रालयाकडे निविदा भरल्या आहेत. चीन आणि पाकिस्तानच्या कारवाया लक्षात घेता या विमानांची खरेदी लवकरात लवकर पूर्ण व्हावी, यासाठी हवाई दल आग्रही आहे.
मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर,
Add करा 9333333548 हा आमचा नंबर

No comments:
Post a Comment