कंधार/वार्ताहर - भांडी हा मानवाचा दैनंदिन जीवनातील अविभाज्य भाग आहे. धान्य साठवणे, अन्न शिजवणे, अन्न सेवन करणे इत्यादीसाठी भांड्यांचा वापर पूर्वी होत असे. आजही काही प्रमाणात मातीची भांडी बनवली व वापरली जातात. तोच भाग समोर ठेवून श्री शिवाजी हायस्कुलचे मराठी विषयाचे शिक्षक तुकाराम कारागीर यांनी 7 वीच्या पाठपुस्तकातील भांड्याच्या दुनियेत हा पाठ प्रत्यक्षात मुलाकडून मातीची भांडी तयार करून धडा शिकवण्यास सुरुवात केली.
शहरालगत असलेल्या भोसीरोडवर श्री शिवाजी हायस्कुल येथे बहुतांश शेतकर्यांची मुलं शिक्षणाचे धडे गिरवतात. विषयास अनुसरून घेतलेल्या या उपक्रमात मुलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन मातीची भांडी तयार करून मातीच्या भांड्याचे विशेष महत्व पटवून देणारा हा धडा ठरला. यावेळी मुलांनी मातीचे जाते, दिवे,चूल, काटवट, उखळ, पोळपाट, वांगे, सीताफळ तसेच लहान भांडी व पळसापासून बनविलेल्या पत्रवाळ्या, द्रोण अशा अनेक प्रकारच्या वस्तू बनवून त्याचे महत्व सांगितले.
काही ठिकाणी तर नागरिक स्वत:च लागणारी भांडी बनवून वापरत असायची या मातीच्या भांड्यातील अन्नाला अधिक चव असते अशी माहिती मुलांनी दिली. लग्न, सण उत्सव घरगूती कामासाठी घातक असे रासायनिक रंगाचा वापर, प्लास्टिक पासून बनवल्या जाणार्या वस्तूमुळे पर्यावरणाचा र्हास होत असल्याचेही मुले बोलत होते. केळी, पळस व बदामाच्या पानालाही येणार भाव. घरगुती धार्मिक कार्यात आवर्जून केळीची पाने मागविली जातात.श्रावणात मोठ्या प्रमाणात केळी, पळस व बदामाचे पाने शहरात येत असतात. यावेळी केळी, पळस व बदामाचे पानेही महाग होतील व पुन्हा जुनेच दिवस येतील अशी अशा यावेळी व्यक्त करण्यात आली.
या ंकल्पनेला शाळेचे मुख्याद्यापक संगेवार,पर्यवेक्षक बगाडे यांनी कु.प्रतीक्षा, अनुष्का, शिवानी, वैष्णवी, अर्चना, सृती, सानिया, यशोदीप, करण, विजय, समाधान, नारायणसह 40 सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक व शाबासकी दिली. तर मराठी विषयाचे शिक्षक तुकाराम कारागीर याच्या संकल्पनेतुन घेण्यात आलेल्या उपक्रमाबद्दल त्यांची स्तुती केली.

No comments:
Post a Comment