मुंबई, दि.११..पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पोषण आहार महिना या निमित्त घेतलेल्या आजच्या व्ही.डी.ओ. कॉन्फरन्समध्ये अंगणवाडी सेविकांच्या मानधनातील केंद्राचा हिस्सा तीन हजार रूपयांवरुन साडेचार हजार रुपये म्हणजे १हजर५००रूपयांची वाढ केल्याबद्दल राज्याच्या महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी त्यांचे आभार मानले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पोषण आहार महिन्यानिमित्त संवाद या उपक्रमात व्ही.डी.ओ.कॉन्फरन्स घेतली. यामध्ये अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ केल्याची घोषणा केली. या काँन्फरन्स मध्ये आशा, अंगणवाडी सेविका आणि एएनएम उपस्थित होत्या पंतप्रधान यांनी आज व्ही.डी.ओ.कॉन्फरन्सद्वारे प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान होम बेस्ड यंग चाईल्ड केअर, जननी सुरक्षा उपक्रम, राष्ट्रीय कृमी मुक्त दिवस, ॲनिमिया मुक्त भारत आणि प्रधानमंत्री मातृवंदना योजना या विषयांवर मार्गदर्शन केले.
राज्याच्या महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी अंगणवाडी सेविका आणि त्यांच्या विविध संघटनांना नेहमी शासन आपल्या मागण्यांबाबत सकारात्मक असल्याचे सांगितले होते. आज पंतप्रधान मोदी यांनी अंगणवाडी सेविकांच्या मानधनात केंद्राची वाढ झाल्याने माझ्या अंगणवाडीत काम करणाऱ्या भगिनींना दिलासा मिळाल्याने मला अतिशय आनंद झाला आहे अशी प्रतिक्रिया देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले.
एकात्मिक बालविकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत सेवा शुन्य ते सहा वर्ष वयोगटातील मुलांच्या विकासाकडे लक्ष देण्यासाठी राज्यात आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना कार्यालयाकडून राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत पुरविण्यात येणाऱ्या सेवा व त्याबाबतचे आर्थिक निकष केंद्र शासनाकडून वेळोवेळी मंजूर करण्यात येतात. अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविका यांच्या मानधनासाठी केंद्र शासनाकडून ६० टक्के व ४० टक्के राज्य शासनाकडून निधी केंद्र शासनाच्या निकषानुसार मंजूर करण्यात येतो.

No comments:
Post a Comment