डिसेंबरपर्यंत गंगा नदी स्वच्छ होईल: नितीन गडकरी

Tuesday, September 11, 2018
गंगा दूषित करणारे 251 उद्योग बंद 

बागपत : .या वर्ष डिसेंबरपर्यंत गंगा नदी ७० ते ८० टक्के स्वच्छ केली जाईल, असा दावा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केला आहे.गंगा नदीच्या स्वच्छतेचे काम वेगाने सुरू आहे. त्यांचे चांगले परिणामही समोर येत असल्याचे नितीन गडकरी यांनी म्हटले. उत्तर प्रदेशमधील बागपत येथे रस्ते योजनांच्या लोकार्पण सोहळ्यावेळी ते बोलत होते. 

गंगा नदीचे पाणी प्रदूषित होऊ नये यासाठी सरकार विशेष प्रयत्नशील आहे .त्यामुळेच नदीतील पाणी प्रदूषित करणारे 251 उद्योग बंद करण्यात आले असून 938 उद्योगांमधून निघणाऱ्या प्रदूषणावर लक्ष ठेवण्यात आले आहे अशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली

उत्तर प्रदेशातील बागपत येथे रस्ते योजनांच्या लोकार्पण सोहळ्यात गडकरी बोलत होते. आपल्या भाषणात ते म्हणाले की गंगा नदीच्या स्वच्छतेचे काम गतिने सुरु आहे .त्याचे चांगले परिणामही दिसून येत आहेत. यावर्षीच्या डिसेंबर अखेर गंगा नदी 70 ते 80 टक्के स्वच्छ केली जाईल. मागील चार वर्षांत केंद्र शासनाने गंगा नदी स्वच्छ करण्यावर विशेष लक्ष दिले आहे .नदीतील पाणी प्रदूषित करणारे 211 मोठे नाले शोधण्यात आले आहेत .गंगा स्वच्छ करण्यासाठी नमामि गंगा मिशन अंतर्गत आजपर्यंत 195 योजनांना मंजुरी दिल्याचे गडकरी म्हणाले .

बागपत येथे दिल्ली-सहारनपूर राष्ट्रीय महामार्गाच्या रूंदीकरणाचा शुभारंभ त्यांनी केला. यावेळी जाहीर सभेत ते बोलत होते. केंद्र सरकार रस्ते निर्मितीवर जास्त लक्ष देत आहे. रस्ते चांगले असतील तर विकासाचा वेग आणखी वाढेल, असे ते म्हणाले. नवीन रस्ते योजनेमुळे दिल्ली ते मीरतचे अंतर अवघ्या ४० मिनिटांत होईल असे त्यांनी सांगितले. आधी यासाठी सुमारे ४ तास लागत.

यावेळी दिल्ली - सहारनपुर या राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरण कामाचा शुभारंभ गडकरींच्या हस्ते करण्यात आला .केंद्र शासन रस्ते निर्मितीवर लक्ष देत आहे .चांगल्या रस्त्यांमुळे विकासाचा वेगही वाढेल .हा नवा रस्ता झाल्यानंतर दिल्ली ते मिरत या चार तास लागणाऱ्या अंतरासाठी केवळ चाळीस मिनिटे लागतील असेही ते म्हणाले.

No comments:

Post a Comment