जिल्हा पोलिस अधीक्षक राजेंद्र माने यांच्या हस्ते ट्रॉफी हाऊसचा शुभारंभ

Sunday, September 9, 2018


लातूर, दि. 9 : येथील नाना-नानी पार्क येथे एकेएस ट्रॉफी हाऊसचा शुभारंभ रविवारी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. राजेंद्र माने यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्यवाह नितीन शेटे हे होते. 

या ट्रॉफी हाऊसमध्ये ट्रॉफी, शिल्ड, मेडल, मोमेन्टो, कप, ढाल, कस्टमाईट, अवॉर्ड उपलब्ध करून देण्यात आली आहेत. खेळाचे पारितोषिक असो की, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार यासाठी लागणारे चषक, स्मृतीचिन्ह येथे मिळणार असल्याचे सर्वांची गैरसोय दूर झाली आहे. मराठवाड्यातील हे पहिलेच ट्रॉफी हाऊस आहे.

याप्रसंगी पोलिस अधीक्षक डॉ. माने व शेटे यांनी या हाऊसचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमास डॉ. विशाल चौधरी, जफर शेख, गोविंदप्रसाद जाजू, प्राचार्य अझहर शेख, महेबूब शेख यांच्यासह क्रीडा, शैक्षणिक आदी क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment