मराठमोळी मृण्मयीचे बॉलीवुडमध्ये पदार्पण

Monday, September 17, 2018

सिनेमात काम करणं हे आजच्या तरुण वर्गाचं मोठं आकर्षण, आणि बॉलीवुडमध्ये म्हणजेच हिंदी सिनेमात काम करणे हे तरुण वर्गासोबत तमाम भाषेतल्याकलाकरांसाठीचे स्वप्न. परंतु हे स्वप्न सत्यात अवतरलंय मराठी अभिनेत्री मृण्मयी कोलवालकर सोबत. होय, ही मराठमोळ अभिनेत्री ए.जे.एंटरटेनमेंट या निर्मितीसंस्थेअंतर्गत जतिन उपाध्याय, अलोक श्रीवास्तव निर्मित, आणि अलोक श्रीवास्तव दिग्दर्शित “एंड-काऊंटर” या हिंदी सिनेमातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करते आहे.या सिनेमात तिचा नायक, दाक्षिणात्य आणि हिंदी सिनेमातील गुणी अभिनेता प्रशांत नारायणन आहे. सध्या या सिनेमाचे चित्रीकरण महाराष्ट्रातील नाशिकजिल्ह्यातील निसर्गरम्य ठिकाणी सुरु आहे.

मूळ पुण्याच्या मृण्मयीने यापूर्वी पुण्यात राहून अनेक सौंदर्य स्पर्धेत विजेतेपद मिळवले असून, मॉडेलिंग जगतात तिने चांगला जम बसवला आहे. मृण्मयी सांगते,काही वर्षांपूर्वी दिग्दर्शक अलोक श्रीवास्तव हे पुण्यात एका मराठी सिनेमाच्या ऑडिशनसाठी आले होते, त्यांना एक मॉडर्न मुलगी हवी होती, त्यांनी माझी निवड केलीआणि मला मिस मॅच नावाचा पहिला मराठी सिनेमा मिळाला होता, ज्यात भूषण प्रधान माझा नायक होता. त्यांच्याच “एंड-काऊंटर” या हिंदी सिनेमात मी रेणू सहायनावाची नायिका साकारते आहे. रेणू ही एक कांदबरीकार आहे. मॉडर्न आहे, स्वतंत्र आहे, नैतिकता जपणारी आहे. आयुष्यात ज्या गोष्टी योग्य आहेच त्याच तिलाकरायला आवडतात. प्रशांत नारायणन सिनेमात माझा लिव्हिंग पार्टनर आहे.

या हिंदी सिनेमाबद्दल मृण्मयी सांगते की, चित्रीकरण करण्यापूर्वी अलोक सरांनी माझे वर्कशॉप घेतले होते. सिनेमातील अभिमन्यू सिंग, व्रिजेश हिरजी, अनुपमश्याम, उदय टिकेकर, एहसान कुरेशी, रणजीत, सत्यंवदा सिंग, सत्यशील नायक इ. कलाकरांनी काम करतांना मला कोणतेही दडपण वाटू दिले नाही हेच त्यांचेमोठेपण आहे. या हिंदी सिनेमाकडून मला खूप अपेक्षा आहेत. या सिनेमामुळे मला हिंदीचे दरवाजे उघडतील अशी मला अपेक्षा आहे.

No comments:

Post a Comment