पंतप्रधान मोदी वाढदिवसासाठी वाराणसीत ५३४ कोटींच्या योजनांचे उद्घाटन

Sunday, September 16, 2018

वाराणसी : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ६८वा वाढदिवस १७ सप्टेंबर रोजी साजरा करण्यात येत आहे. यानिमित्ताने पंतप्रधान त्यांच्या वाराणसी लोकसभा मतदारसंघाचा दौरा करून ५३४ कोटी रुपयांच्या विविध योजनांचे उद्घाटन करणार आहेत.

 सोमवारी पंतप्रधान मोदी वाराणसीच्या दोन दिवसीय दौऱ्यावर येत आहेत. प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसोबत केक कापून ते वाढदिवस साजरा करतील. मंगळवारी ते वाराणसी हिंदू विद्यापीठात आयोजित केलेल्या एका सभेला संबोधित करतील. त्यांच्या हस्ते अटल इन्क्युबेशन सेंटर, नागपूर ग्राम पेयजल योजना तसेच पूर्वांचल वीज वितरण महामंडळ मर्यादित विविध योजनांचे उद्घाटन होणार आहे. याबरोबरच त्यांच्या हस्ते बीएचयू येथील वेद विज्ञान केंद्राचे व नेत्ररोगशास्त्र विभागीय संस्थेचा शिलान्यास केला जाणार असल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष हंसराज विश्वकर्मा यांनी दिली. काशी विश्वनाथांच्या मंदिरातही मोदी पूजा करतील..

No comments:

Post a Comment