मतदार संघाच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : आ.डी.पी.सावंत यांची ग्वाही

Sunday, September 30, 2018
]
नांदेड - सध्याचे सरकार केवळ योजनांचे नावे बदलण्याचे काम करीत आहे. प्रत्यक्षा जनतेच्या हिताचा एकही निर्णय घेतला जात नाही. त्यातही या सरकारला वेगवेगळ्या पातळीवर भांडून नांदेड उत्तरसाठी आपण निधी खेचून आणत आहोत. भविष्यातही या मतदार संघाच्या विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही अशी निःसंदीग्ध ग्वाही जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आ.डी.पी.सावंत यांनी दिली.

मुख्यमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत नांदेड तालुक्यातील पोखर्णी आणि खुरगाव या ठिकाणी निर्माण करण्यात येत असलेल्या रस्त्याच्या भूमीपूजन प्रसंगी ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. आ.सावंत पुढे म्हणाले की, मागील नऊ वर्षांपासून आपण या भागाचे प्रतिनिधीत्व करीत आहोत. केेंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी खेचून आणला. नांदेड जिल्ह्याच्या विकासामध्ये अडसर आणण्याचे काम शासन करीत आहे. लोकांच्या कल्याणकारी योजना प्रभावीपणे राबविण्याऐवजी केवळ आघाडी सरकारच्या काळातील योजनांचे नाव बदलण्याचे काम हे सरकार करीत आहे. यावेळी मागील चाळीस वर्षांपासून मागणी असलेल्या पोखर्णी येथील कॅनॉल ब्रीजची सातत्यपूर्ण प्रयत्न करुन निर्मिती आ.डी.पी.सावंत यांनी केली. या कॅनॉल ब्रीजचा लोकार्पण सोहळा करण्यात आला.तसेच दोन्ही गावातील सुध्द पिण्याच्या पाण्याचा प्रकल्प डिजीटल शाळा खोली, व पेव्हर ब्लॉकचाही लोकार्पण सोहळा करण्यात आला.

यावेळी काँग्रेसचे प्रवक्ते संतोष पांडागळे, विधी सल्लागार अ‍ॅड.निलेश पावडे आदींची समयोचित भाषणे झाली. पोखर्णी आणि खुरगाव याठिकाणी झालेल्या या भूमिपूजन सोहळ्यास दोन्ही गावातील नागरिकांसह परिसरातील काँगे्रस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment