नांदेड,(प्रतिनिधी)-1 ऑक्टोबर हा जागतिक ज्येष्ठ नागरिेक दिन म्हणुन साजरा केला जातो. या दिवसाचे महत्व अतिशय मोठे आहे. या दिवशी जगातील सर्व राष्ट्रामध्ये प्रत्येक ज्येष्ठांनी आपलं संपूर्ण आयुष्य आपल्या कुटूंबासाठी, समाजासाठी आणि पर्यायाने राष्ट्र उभारणीसाठी खर्ची घातलेले असते म्हणुन त्यांच्या केलेल्या कार्याप्रति, कर्तृत्वाप्रती तथा त्यागाप्रति ऋण व्यक्त केले जाते. सेवा भाव जपला जातो. त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेतली जाते. आपल्याही देशात इतर राज्याप्रमाणे महाराष्ट्रातही हा दिवस मोठ्या आंनदाने साजरा केला जातो. ज्येेष्ठांसाठी अहोरात्र कार्य करणार्या देशात अॅस्कॉम आणि महाराष्ट्रात फेस्कॉम या संघटनांच्या निर्देशाप्रमाणे नांदेड येथेही सहयोग ज्येष्ठ नागरिक संघ, नांदेड जिल्हा ज्येष्ठ नागरिक संघ समन्वय समिती, शिख ज्येष्ठ नागरिक संघ, शिख वुमेन्स वेेेल्फेअर सोसायटी आणि राणी लक्ष्मीबाई महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ नागरिक दिन मोठ्या प्रमाणात आणि आगळ्या वेगळ्या पध्दतीने साजरा करण्याचे ठरले आहे.
या कार्यक्रमास सर्वश्री संत बाबा कुलवंतसिंघजी, संत बाबा बलविंदरसिघजी, जिल्हाधिकारी, जिल्हा न्यायाधिश, जिल्हा पोेलीस अधिक्षक, म.न.पा.आयुक्त व महापौर उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमात सर्वश्री डी.के.पाटील (अध्यक्ष, उ.म.वि. ज्येष्ठ नागरिक महासंघ फेस्कॉम), फेस्कॉमचे अतिरिक्त सचिव अशोक तेरकर, महिला ज्येष्ठ नागरिक संघाच्या अध्यक्षा सौ.ज्योतिताई डोईफोडे, द.मा.रेड्डी अध्यक्ष पेन्शनर्स असोसिएशन, अंबेकर अध्यक्ष, अल्प पेन्शन धारक संघटना ई.पी.एस.95, ज्येष्ठ नागरिक जिल्हा समन्वय समितीचे उपाध्यक्ष व्यंकटेश बुलबुले, रावके अध्यक्ष ज्येष्ठ ना.संघ शहर समन्वय समिती आणि नांदेड जिल्ह्यातील सर्व ज्येष्ठ नागरिक संघाचेे पदाधिकारी तथा सदस्य सहभागी होणार आहेत.
विशेष म्हणजे या कार्यक्रमास नांदेड जिल्ह्यातील 60 वर्षावरील सर्वच महिला-पुरूष ज्येष्ठ नागरिकांना (शहर व ग्रामीण भागातील) कार्यक्रमास आवर्जुन उपस्थित राहण्याचे व सहभाग नोंदविण्याचे आवाहन डॉ.हंसराज वैैद्य, प्रकाश कौर खालसा, श्रीमती पुणिता रावत तथा श्रीमती प्रभा चौधरी यांनी केले आहे.
कार्यक्रमाची सुरूवात डॉ.हंसराज वैद्य यांच्या वैद्य रूग्णालय पोलीस अधिक्षक कार्यालय वजिराबाद चौक येथून भव्य मोर्चाने सकाळी 10 वाजता सुरूवात होईल. मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज पुतळा मार्गे जिल्हाधिकारी कचेरी समोर, मा.मुख्यमंत्र्यांना जिल्हाधिकारी यांचे मार्फत मागण्याचे निवेदन देवून, म. गांधींजीच्या पुतळ्यासमोरून चिखलवाडी मार्गे गुरूद्वारा चौक, लंगर साहेब गुरूद्वारा बरसी सभागृह येथे 11 वाजता पोहचेल.
सकाळी 11 वाजता मान्यवरांचे साक्षीने केक कापुन उपस्थित सर्व ज्येष्ठ नागरिकांचा सार्वजनिक वाढदिवस साजरा केला जाईल. प्रातिनिधिक स्वरूपात काही ज्येष्ठ मान्यवरांचा सन्मान/सत्कार मान्यवरांच्या हस्ते केला जाईल. मान्यवरांचे मार्गदर्शनानंतर, सांस्कृतिक कार्यक्रम व मिष्टान्न भोजनाने कार्यक्रमाची सांगता होईल.

No comments:
Post a Comment