मुंबई : बॉलिवूड अभिनेता शाहीद कपूर हा दुसऱ्यांदा बाबा झाला. शाहीदने आपल्या बाळाचं 'झैन' असं नामकरण केलं आहे. शाहीदची पत्नी मीराने खारच्या हिंदुजा रुग्णालयात बुधवारी 5 सप्टेंबर ला मुलाला जन्म दिला.
शाहीदने ट्विटरवरुन आपल्या बाळाचं नाव जाहीर केले. मात्र अद्याप त्याने चिमुकल्याचा फोटो चाहत्यांसोबत शेअर केलेला नाही.
'झैन कपूरचं आगमन झालं आहे. आम्हाला परिपूर्ण झाल्यासारखं वाटतं. तुमच्या शुभेच्छा आणि आशीर्वादासाठी आभार. आम्हाला अत्यंत आनंद झाला आहे. लव्ह यू' असं ट्वीट शाहीदने केलं आहे.
आपल्या घरातील छोट्या पाहुण्याच्या स्वागतासाठी शाहीदसह कपूर कुटुंबातील सर्व जण रुग्णालयात उपस्थित होते. शाहीदची मोठी मुलगी मिशाने आज सकाळी हॉस्पिटलमध्ये जाऊन चिमुरड्या भावाची भेट घेतली. मिशाने काहीच दिवसांपूर्वी आपला दुसरा वाढदिवस साजरा केला.

No comments:
Post a Comment