आशिया चषकात टीम इंडियाच्या कर्णधार पद रोहित शर्माच्या खांद्यावर

Saturday, September 1, 2018

मुंबई : सप्टेंबर महिन्यात दुबईमध्ये होणाऱ्या आशिया चषकासाठी आज 16 सदस्यांच्या भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. भारताचा नियमित कर्णधार विराट कोहलीला या स्पर्धेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे भारतीय संघाची कर्णधाराची धुरा रोहित शर्माकडे सोपवण्यात आली आहे.

दुखापतीतून सावरलेला केदार जाधव, भुवनेश्वर कुमार, अंबाती रायुडू यांचंही आशिया चषकातून पुनरागमन होणार आहे. तर राजस्थानच्या खलील अहमद या युवा खेळाडूचंही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण होत आहे.

आशिया चषकासाठी भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन (उपकर्णधार), लोकेश राहुल, अंबाती रायुडू, मनीष पांडे, केदार जाधव, महेंद्रसिंह धोनी, दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, कुलदीप यादव, यजुवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमरा, शार्दुल ठाकूर आणि खलील अहमद

आशिया चषकाचं वेळापत्रक

ग्रुप राऊंड

15 सप्टेंबर : बांगलादेश वि.श्रीलंका (दुबई)

16 सप्टेंबर : पाकिस्तान वि. क्वालीफायर (दुबई)

17 सप्टेंबर : श्रीलंका वि. अफगाणिस्तान(अबु धाबी)

18 सप्टेंबर : भारत वि. क्वालीफायर (दुबई)


19 सप्टेंबर : भारत वि. पाकिस्तान (दुबई)


20 सप्टेंबर : बांगलादेश वि. अफगाणिस्तान (अबु धाबी)

21 सप्टेंबर : गट अ विजेता वि. गट ब उप विजेता (दुबई), गट ब विजेता वि. गट अ उप विजेता (अबु धाबी)

23 सप्टेंबर : गट अ विजेता वि. गट अ उप विजेता (दुबई), गट ब विजेता वि. गट ब उप विजेता (अबु धाबी)

25 सप्टेंबर : गट अ विजेता वि. गट ब विजेता (दुबई)

26 सप्टेंबर : गट अ उप विजेता वि. गट ब उप विजेता (अबु धाबी)

28 सप्टेंबर : फायनल (दुबई)

No comments:

Post a Comment