लातूर /प्रतिनिधी :हमीभाव योजने अंतर्गत शासनास विकलेल्या तूर आणि हरभरा या पिकांचे पैसे मिळत नसल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरु करण्यात आले होते .या आंदोलनाची दखल घेत राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरु केली असुन यामुळे संघटनेने आपले आंदोलन स्थगित केले असल्याची माहिती संघटनेचे लातूर व उस्मानाबाद जिल्हा संपर्क प्रमुख राजेंद्र मोरे यांनी दिली .
सहा महिन्यां पुर्वी शेतकऱ्यांनी तूर व नंतर हरभरा फेडरेशन ला दिला होता .सात दिवसात पैसे देण्याचे आश्वासन शासनाने दिले होते पण पैसे मिळाले नाहीत. त्यामुळे दि .६ ऑगस्ट पासून बेमुदत धरणे सुरु करण्यात आले होते. संघटनेच्या या आंदोलनास मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक अभिमन्यु पवार यांनी भेट दिली .संबधित खात्याचे मंत्री सुभाष देशमुख यांच्याशी त्यांनी दूरध्वनीवरुन चर्चा केली. त्यावेळी देशमुख यांनी पुढील चार दिवसात सर्व शेतकऱ्यांचे पैसे खात्यावर जमा करण्याचे आश्वासन दिले. आंदोलन सुरु झाल्यापासून शासनाने पैसे जमा करण्यास प्रारंभ केला असुन आतापर्यंत दोन हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले आहेत. त्यामुळे हे आंदोलन मागे घेण्यात आले .यावेळी सत्तार् पटेल व सचिन ढवण यांनी शासनाने घोषित केलेले एक हजार रुपये अनुदान लवकर देण्याची मागणी केली. ही बाब मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालण्याचे आश्वासन पवार यांनी दिले .
या आंदोलनास माजी आमदार वैजनाथ शिंदे ,बाजार समितीचे उपसभापती मनोज पाटील ,संचालक संभाजीराव वायाळ ,शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संतोष सोमवंशी यांनी भेट देवून आपला पाठिंबा दर्शवला होता .
या आंदोलनात सत्तार पटेल ,विजय जाधव, अरुण दादा कुलकर्णी ,धर्मराज पाटील ,ॲड सचिन ढवण ,व्यंकट मुळके ,नवनाथ शिंदे,गुरुलिंग मोदी ,गणेश माडजे ,दत्तू टिपे दिगंबर तारडे शिवाजी जाधव,बबन चव्हाण, आदींनी सहभाग घेतला .

No comments:
Post a Comment