'दयानंद' महाविद्यालयाच्या कर्मचाऱ्याचा उत्स्फूर्त प्रतिसाद
लातूर - आपल्या विविध मागण्यासाठी ७ ते ९ ऑगस्ट २०१८ या कालावधीत महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी संप पुकारला असून, संपाच्या दुसऱ्या दिवशीही दयानंद विज्ञान, वाणिज्य, कला आणि विधी महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांनी बंदमध्ये उत्फुर्तपणे सहभाग नोंदवत ठिय्या आंदोलन केले.
सातवा वेतन आयोग त्वरित लागू करावा, अंशदायी पेन्शन योजना रद्द करण्यात यावी, पाच दिवसाचा आठवडा करावा व निवृत्तीचे वय ६० वर्षे करावे आदी मागण्या दीर्घकाळ प्रलंबित राहिल्याने सरकारी-निमसरकारी कर्मचारी शिक्षण संघटना समन्वय समिती यांच्या वतीने हा संप पुकारण्यात आला आहे. याला लातूर शहरात उत्तम प्रतिसाद मिळाला असून, लातुरातील दयानंद, शाहू, जयक्रांती, सुशीलादेवी देशमुख, सरस्वती संगीत आदी महाविद्यालयातील शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी १०० टक्के सहभाग नोंदविला. दयानंद परिवारातील सर्व महाविद्यालयातील कर्मचारी बंधू-भगीनींनी या संपात सहभाग नोंदवित महाविद्यालय परिसरात ठिय्या आंदोलन केले.
हा संप यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचारी संघाचे राज्य प्रतिनिधी धनराज जोशी, रामकृष्ण सलगर, कार्यालयीन अधीक्षक रुपचंद कुरे, नवनाथ भालेराव, उत्तम कुमरे, दत्ता आळंदकर, रमेश देशमुख, राजेश सेलूकर, युनिट प्रमुख सुनील खडबडे, लक्ष्मीकांत वाघ, बन्शी कांबळे, सुभाष एकतारे आदींसह कर्मचारी बंधू आणि भगिनींनी पुढाकार घेतला. यावेळी महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचारी संघाचे राज्य प्रतिनिधी धनराज जोशी यांनी मार्गदर्शन केले. दरम्यान, या संपास मंगळवारी वरिष्ठ महाविद्यालय प्राध्यापक संघटना स्वा मुक्टा व कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापक संघटना जुक्टा यांनी पाठींबा जाहीर केला आहे.

No comments:
Post a Comment