पुणे ः ठिय्या आंदोलनावेळी गोंधळ घालणारे मराठा आंदोलक नव्हते. मराठा आंदोलनात बाह्य शक्ती घुसल्याने हिंसाचार झाल्याचे मत मराठा मोर्चा समन्वय समितीने व्यक्त केले आहे . यापुढे मराठा आरक्षणासाठी रस्त्यावर आंदोलन होणार नसून तालुका व जिल्हास्तरावर साखळी उपोषण करणार असुन स्वातंत्र्यदिनापासून चुल बंद करुन अन्नत्याग आंदोलन करणार असल्याचे मराठा मोर्चा समन्वय समितीने जाहीर केले आहे.
पुण्यात समितीच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत ही घोषणा करण्यात आली.
आम्ही शांततेने आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता. काही ठिकाणी रास्ता रोको, रेल रोको आणि ठिय्या आंदोलन करण्यात अले. पुण्याच्या बैठकीत तसे ठरलेही होते. पण आंदोलनाला बाह्यशक्तींमुळे गालबोट लागले. आम्ही एक वाजता पुणे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. त्यानंतर राष्ट्रगीत म्हणून आम्ही सर्वांना घरी जाण्यास सांगितले. आम्ही तेथून गेल्यानंतर हा गोंधळ झाला. एका चांगल्या आंदोलनाला गालबोट लावण्याचा प्रयत्न झाला.
आंदोलनावेळी जो हिंसाचार घडला त्याचा आम्ही निषेध करतो.आंदोलनादरम्यान तोडफोड करणारे आमचे कार्यकर्ते नव्हते ते कोण होते याचा शोध घेवून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत. आरक्षणासाठी शांततेत आंदोलन करणाऱ्यावर दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत , आता यापुढे रस्त्यावर न उतरता तालुका व जिल्हास्तरावर चक्री उपोषण केले जाईल. त्याचबरोबर आत्मक्लेश म्हणून येत्या १५ ऑगस्ट रोजी आम्ही चूलबंद आंदोलन करणार आहोत. मागण्या मान्य होईपर्यंत आम्ही उपोषण करणार असल्याचे समन्वय समितीने स्पष्ट केले
मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर,
Add करा 9333333548 हा आमचा नंबर
Add करा 9333333548 हा आमचा नंबर
No comments:
Post a Comment