मनपाच्या आवारात दगडफेक ३ कार चे नुकसान अनेक भागात वीज पुरवठा खंडित

Thursday, August 9, 2018


लातूर दि  सत्यजीत बद्दर 
मराठा क्रांती मोर्चा आंदोलकांच्या वतीने गुरुवारी लातूर शहरातील विविध भागात दुचाकीवर रॅली काढणाऱ्या कार्यकर्त्यांनी दुपारच्या सुमारास लातूर शहर महानगर पालिकेच्या आवारात दगडफेक केली या घटनेमुळे आवारात पार्किंग केलेल्या ३ वाहनाचे काचा फुटल्याने नुकसान झाले या वेळी उपस्थित कर्मचाऱ्यांनी मुख्य प्रवेशद्वाराचे गेट लावून घेतले . 

टायर जाळंल्याने वीज पुरवठा खंडित 
लातूर शहरातील प्रमुख रस्त्यावर आंदोलकांनी सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात टायर जाळून रास्ता रोको आंदोलन केले अनेक ठिकाणी आगीचे आणि धुराचे लोट महावितरणच्या वीज पुरवठा करणाऱ्या तारण लागत असल्याने खबरदारी म्हणून अनेक भागात विद्युत  पुरवठा खंडित करण्यात आला होता

No comments:

Post a Comment