सिरसाळा येथे किसान सभेच्या वतीने जेल भरो आंदोलन

Thursday, August 9, 2018



परळी:- (प्रतिनिधी)
अखिल भारतीय किसान सभेच्या वतिने सिरसाळा येथे जेल भरो आंदोलन करण्यात आले. 
सरकारच्या शेतकऱ्याबाबतीत आडमुट्या धोरणाच्या विरोधात महाराष्ट्र राज्य किसान सभा च्या वतीने देशव्यापी जेलभरो आंदोलन करण्याची हाक देण्यात आली होती. देशभरातील शेतकरी राजा लाखोंच्या संख्येने शेतकऱ्यांच्या मागण्यांना घेऊन किसान सभेच्या नेतृत्वात या आंदोलनात उतरुन जुल्मी सरकारच्या विरोधात एल्गार पुकारण्यात आला आहे. 

देशामध्ये व राज्यात भाजपचे सरकार आल्या पासुन शेतकरी विरोधी धोरण घेऊन शेतकर्‍यांना अत्महत्यास भाक पाडत आहे. राज्य व केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे शेतकरी कंगाल झाला आहे.शेतकरी विरोधी धोरणामुळे शेतकर्‍यांच्या अत्महत्यात वाढ होत आहे. मार्च महिन्यात किसान सभाच्या वतीने नाशिक ते मुंबई लॉंग मार्च काढण्यात आला. ६०,००० पेक्षा जास्त शेतकरी यात सहभागी झाले . यामुळे सरकार हदरुन गेले होते. लॉग मार्च ने केलेल्या संपुर्ण मागण्या मुख्यमंत्री व मुख्यसचिवांनी मान्य केल्या व विधानसभा ची समती दिली. परंतु आतापर्यंत त्यांची अमलबजावणी पुर्णपणे केलेली नाही. विमा कंपनी शेतकर्‍यांच्या डोळ्यात धूळ फेकण्याचे काम करीत आहेत बोंड आळीचे अनुदान सर्व शेतकर्‍यांच्या खात्यात जमा केलेले नाही कारखानदारानी ऊसाचे संपुर्ण बीले काढलेले नाही त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे बँका शेतकर्‍यांना कर्ज वाटप करण्यात टाळा टाळ करत आहेत या सर्व शेतकरी प्रश्नावर सिरसाळा येथे जेल भरो आंदोलन करण्यात आले. 

अखिल भारतीय किसान सभा ही वेळोवेळी शेतकऱ्याच्या प्रश्नावर लढत असुन राज्य सरकारने केलेल्या फसव्या कर्जमाफीचा विरोध करत असुन शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी.तषेच स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी तात्काळ लागू करुण आयोगाची अमलबजावणी करावी.मराठा समाजाला अरक्षण द्या, कपाशीच्या पिकावरील बोंडअळीच्या रोगामुळे झालेली नुकसान भरपाई द्या,.नाशिक ते मुंबई किसान सभेने पायी काढलेला ऐतिहासिक लॉन्ग मार्चच्या वेळी दिलेली आश्वासने तात्काळ पूर्ण करावी व इतर मागण्याना घेऊन .जेल भरो आंदोलन करण्यात आले,.या वेळी किसान सभा नेते कॉ उत्तम माने, कॉ अजय बुरांडे, प्रभाकर नागरगोजे, गंगाधर पोटभरे,कॉ भगवान बडे, सुदाम शिंदे, अमोल वाघमारे, बाबा शेरकर, अनिरुद्ध गायकवाड, मुरलीधर नागरगोजे, रुस्तुम माने, राम भोरकडे, मदन वाघमारे ,आशाबाई नानवटे, अदि उपस्थित होते.

No comments:

Post a Comment