हिंगोली / प्रतिनिधी
दरवर्षी येथील सिटीक्लब येथे भव्य दांडिया उत्सावाचे आयोजन केले जाते. यंदाही सप्टेंबर महिन्यात हा उत्सव आयोजित करण्यात आला असून या दांडिया उत्सवाच्या महिला कार्याध्यक्षपदी सुनिता मुळे तर पुरूष कार्याध्यक्षपदी रवि नैनवाणी यांची निवड करण्यात आली आहे.
रविवारी दांडिया उत्सवाबाबत येथील देव पॅलेस येथे उत्सव समितीची महत्वपुर्ण बैठक पार पडली. या बैठकीमध्ये 16 सप्टेंबर ते 20 सप्टेंबर असे पाच दिवस दांडिया उत्सव घेण्याचे सर्वानुमते ठरले. तसेच दांडिया उत्सवासाठी विविध समित्या कार्यान्वित करून त्याची जबाबदारीही समितीतील पदाधिकारी, कार्यकर्त्यांना देण्यात आली. यामध्ये कार्याध्यक्षपदी सुनिता मुळे व रवि नैनवाणी यांची निवड करण्यात आली. या बैठकीला सुनिल बगडीया, ओम नैनवाणी, मुरली हेडा, मधूर भन्साळी, राजेश बगडीया, अजय जैन, पंकज सोनी, मयूर सोनी, मयूर चौधरी, पराग कौलवार, रवि नैनवाणी, उमेश भट, सुनिता मुळे, पुष्पा सुराणा, शशी खुराणा, ज्ञानदा रोकडे, डॉ. ज्योत्सना लखमावार आदींची उपस्थिती होती
No comments:
Post a Comment