गणेशमुर्ती बनविण्याच्या कामांना वेग

Wednesday, August 22, 2018


 
औंढा नागनाथ / प्रतिनिधी 
गणपती बाप्पाचे आगमन अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. येथील राजे संभाजीनगर मध्ये बाप्पाची मूर्ती बनवण्याचे काम जोमाने सुरु आहे. यामध्ये लाल बागचा राजा, बालगणेश, पगडीगणेश अशा विविध प्रकारच्या मुर्ती बनविण्यात येत आहेत. तसेच मुर्ती बनविण्याच्या कामांना वेग आला असल्याचे दिसून येत आहे. 

       येत्या 13 सप्टेंबर रोजी गणरायाचे आगमन होणार आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी गणेशमुर्ती बनविण्याचे काम सुरू आहे. यामध्ये औंढा नागनाथ येथील राजे संभाजी नगर मधील कुंभारवाड्यात गणेशमुर्ती बनविण्यासाठी कारागिरांची लगबग सुरू आहे. यामध्ये शाडू, प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती मध्ये बाजारपेठेत लालबागचा राजा, बालगणेश, पगडी गणेश ,पेशवाई मयूर अशा अनेक प्रकारच्या मुर्त्या बनविण्यात येत आहेत. गणेश मुर्ती बनविण्याचे काम अंतिम टप्यात आले असून गणेश मुर्तींना रंगरंगोटी करण्याचे काम सुरू आहे.

No comments:

Post a Comment