पाणीच पाणी... !कयाधूचा रूद्रावतार, अनेक गावांना फटका

Wednesday, August 22, 2018

छाया- गोपाल बोरकर 

हिंगोली / प्रतिनिधी 
गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्हाभरातील नदी, नाले, तुडूंब भरले आहेत. जिल्ह्यातील मुख्य नदी कयाधूला महापूर आल्याने नदीकाठील जवळपास चाळीस ते पन्नास गावांना याचा फटका बसला आहे. यामध्ये शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. 

        गेल्या वीस दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. त्यानंतर गेल्या दोन दिवासांपासून जिल्हाभरात पावसाने हजेरी लावली. मुसळधार सुरू असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील नदी, नाल्यांना पुर आला आहे. यामध्ये कयाधू नदीकाठील गावातील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कोथळज, समगा, वसई, पूर, कंजारा, नांदापूर, सोडेगाव, सालेगाव, चाफनाथ, शेवाळा, डोंगरगाव पूल, सापळी, कसबेधावंडा, कोंढूर डिग्रस, चिखली, कान्हेगाव, पिंपरी, येगाव यासह आदी गावात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या महापूराच्या तडाक्यात उडीद, मुग, सोयाबीन, कापूस, हळद सापडली आहे. शेतशिवार खरडून गेल्याने शेतकऱ्यांना मोठ्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. तर अनेक गावांच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने संपर्कही तुटला आहे. कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर-हदगाव मार्गावरील शेवाळा नजीकच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने हा महामार्ग बंद झाला आहे. बाळापूर-बोल्डा रस्त्यावर झाडे उनमळून पडली होती. तसेच कवडी येगाव येथील रस्ता या पूरामध्ये वाहून गेला आहे. त्यामुळे या दोन गावचाही संपर्क तुटला आहे. जिल्हाभरात सगळीकडे पाणीच पाणी दिसून येत होते. जिल्हाभरातील धरणाची पाणीपातळीही या मुसळधार पावसामुळे वाढली आहे. दरम्यान, या पुरपरिस्थितीचा आढावा हिंगोलीचे उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे, कळमनुरीच्या तहसीलदार प्रतिभा गोरे यांनी घेतला आहे. या पूरामुळे शेतकऱ्यांचे किती नुकसान झाले हे पुरस्थिती ओसरल्यानंतरच समजेल. 

हिंगोली जिल्ह्यात मागील चोवीस तासात मंगळवारी सकाळी 8 वाजेपर्यंत मंडळ निहाय झालेला पाऊस (आकडे मि.मी.मध्ये)
हिंगोली - 81, खांबाळा - 65, माळहिवरा-78, सिरसम बु.-77, बासंबा - 82, नर्सी नामदेव - 48, डिग्रस -37, कळमनुरी - 90, नांदापुर -95, आखाडा बाळापूर-74, डोंरगकडा -58, वारंगाफाटा - 61, वाकोडी-18, सेनगाव- 40, गोरेगाव -50, आजेगाव- 55, साखरा -12, पानकनेरगाव - 45, हत्ता - 48, वसमत - 32, हट्टा - 61, गिरगाव- 37, कुरूंदा- 60, टेंभुर्णी- 35, आंबा- 60, हयातनगर- 74, औंढा नागनाथ- 87, जवळा बाजार-69, येहळेगाव- 93, साळणा- 77 हिंगोली जिल्ह्यात चोवीस तासात एकूण सरासरी पाऊस 61.96 मि.मी.झाला आहे

No comments:

Post a Comment