पावसाळ्यात स्किन टॉनिकचा वापर करावा

Wednesday, August 15, 2018

स्किन टॉनिकचा प्रयोग : 
क्लीजिंगनंतर त्वचेला पाण्याने धुऊन स्वच्छ पुसून घ्यावे. नंतर एक पांढरे स्वच्छ कापड किंवा कापूस स्किन टॉनिकमध्ये बुडवून त्वचेला पुसून काढावे. दिवसातून किमान दोन-तीन वेळा स्वच्छ कपड्याने त्वचेला स्वच्छ करू शकता. स्किन टॉनिकला फ्रीजमध्ये ठेवता येते ज्याने जास्त दिवस त्याचा वापर करू शकता.

स्किन टॉनिकचे फायदे : 
वयानुसार त्वचा (स्किन) हळूहळू ढिली पडत जाते आणि त्यावर डाग दिसणे सुरू होतात. क्लीजिंग केल्यानंतर जेव्हा चांगल्या कंपनीचे स्किन टॉनिक लावतो तेव्हा डाग आपोआपच दूर होण्यास सुरू होतात. ढिली झालेल्या त्वचेतदेखील कसाव येतो. त्वचा पूर्वीसारखी दिसायला लागते. त्वचेत निखार येतो. त्यानंतर मेकअप केल्याने वेगळीच चमक दिसते. 

No comments:

Post a Comment