नांदेड,दि.4 (प्रतिनिधी)-नांदेड हे एक छोटे शहर होते परंतु या शहरात श्री गुरुगोविंदसिंघजी यांचे पवित्र वास्तव्य आल्यामुळे या भूमिला जागतिक स्तरावर महत्व प्राप्त आले. त्रिशताब्दी सोहळयामुळे गुरुद्वाराासह या परिसराचा मोठा विकास करण्याचे सौभाग्य आपणास लाभले. भविष्यात या परिसराचा उर्वरित विकास करण्यास आपण कटिबध्द असल्याचे प्रतिपादन राज्याचे माजी मुख्यमंत्री खा.अशोकराव चव्हाण यांनी आज येथे केले.
लंगर साहिब गुरुद्वाराच्यावतीने सालाना बरसी कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर हूजूर साहिब सचखंड गुरुद्वाराचे मुख्य जत्थेदार संत बाबा कुलवंतसिंघजी, श्री संत बाबा नरेंद्रसिंघजी, श्री संत बाबा बलविंदरसिंघजी, माजी पालकमंत्री आ.डी.पी.सावंत, महापौर शीलाताई भवरे, माजी महापौर बलवंतसिंघ गाडीवाले, माजी उपमहापौर आनंद चव्हाण, सभागृह नेते विरेंद्रसिंघ गाडीवाले, बोर्डमेंबर रविंद्रसिंघ बुंगई, नगरसेवक अमित तेहरा, माजी नगरसेवक किशोर भवरे, आदिंची उपस्थिीती होती.
यावेळी बोलताना खा.चव्हाण पुढे म्हणाले की, गुरु-त्ता-गद्दी सोहळयानिमित्ताने श्री गुरुगोविंदसिंघजी यांच्या विचाराची सेवा करण्याचे आपणास भाग्य लाभले. संतांचा आशीर्वाद व त्यांची शिकवण ही नेहमीच प्रेरणा देणारी असते. बाबा बलविंदरसिंघजी व बाबा नरेंद्रसिंघजी यांचे धार्मिक व सामाजिक काम मोठे आहे. त्यांनी आपणास कधीही हाक दिली तेव्हा आपण त्यांच्यासाठी धावून येवू असे सांगतानाच बाबा बलविंदरसिंघजी यांनी त्यांच्या गुरुवाणी भाषेतील आशीर्वचनामध्ये गुरुद्वारा परिसरातील काही ना दुरुस्त रस्त्यांचा विषय काढला. गुरुंच्या आशीर्वादाने या परिसरात यापूर्वीही मोठे काम केले आहे आणि भाविष्यात देखील उर्वरित कामे करण्याची शक्ती गुरुंनी द्यावी असे सांगतानाच राजकीय जीवनात आपण जे काही मिळविले त्यामागे गुरुंचा मोठा आशीर्वाद असल्याचे यावेळी त्यांनी आवर्जून सांगितले.
सचखंडवाशी संत बाबा निधानसिंघजी, संत बाबा हरनामसिंघजी, संत बाबा आत्मासिंघजी व संत बाबा शिशा सिंघजी यांच्या सालाना बरसी निमित्त लंगर साहिब गुरुद्वारामध्ये मोठा धार्मिक सोहळा आयोजित केला असून या सोहळयास जगभरातून शीख धर्माचे धर्मगुरु व अनुयायी मोठया संख्येने नांदेडमध्ये आले आहेत. या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा भव्य दिव्य सोहळा संपन्न झाला. परिसराच्या विकासासाठी कटिबध्द-खा.चव्हाण
नांदेड,दि.4 (प्रतिनिधी)-नांदेड हे एक छोटे शहर होते परंतु या शहरात श्री गुरुगोविंदसिंघजी यांचे पवित्र वास्तव्य आल्यामुळे या भूमिला जागतिक स्तरावर महत्व प्राप्त आले. त्रिशताब्दी सोहळयामुळे गुरुद्वारासह या परिसराचा मोठा विकास करण्याचे सौभाग्य आपणास लाभले. भविष्यात या परिसराचा उर्वरित विकास करण्यास आपण कटिबध्द असल्याचे प्रतिपादन राज्याचे माजी मुख्यमंत्री खा.अशोकराव चव्हाण यांनी आज येथे केले.
लंगर साहिब गुरुद्वाराच्यावतीने सालाना बरसी कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर हूजूर साहिब सचखंड गुरुद्वाराचे मुख्य जत्थेदार संत बाबा कुलवंतसिंघजी, श्री संत बाबा नरेंद्रसिंघजी, श्री संत बाबा बलविंदरसिंघजी, माजी पालकमंत्री आ.डी.पी.सावंत, महापौर शीलाताई भवरे, माजी महापौर बलवंतसिंघ गाडीवाले, माजी उपमहापौर आनंद चव्हाण, सभागृह नेते विरेंद्रसिंघ गाडीवाले, बोर्डमेंबर रविंद्रसिंघ बुंगई, नगरसेवक अमित तेहरा, माजी नगरसेवक किशोर भवरे, आदिंची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना खा.चव्हाण पुढे म्हणाले की, गुरु-त्ता-गद्दी सोहळयानिमित्ताने श्री गुरुगोविंदसिंघजी यांच्या विचाराची सेवा करण्याचे आपणास भाग्य लाभले. संतांचा आशीर्वाद व त्यांची शिकवण ही नेहमीच प्रेरणा देणारी असते. बाबा बलविंदरसिंघजी व बाबा नरेंद्रसिंघजी यांचे धार्मिक व सामाजिक काम मोठे आहे. त्यांनी आपणास कधीही हाक दिली तेव्हा आपण त्यांच्यासाठी धावून येवू असे सांगतानाच बाबा बलविंदरसिंघजी यांनी त्यांच्या गुरुवाणी भाषेतील आशीर्वचनामध्ये गुरुद्वारा परिसरातील काही ना दुरुस्त रस्त्यांचा विषय काढला. गुरुंच्या आशीर्वादाने या परिसरात यापूर्वीही मोठे काम केले आहे आणि भाविष्यात देखील उर्वरित कामे करण्याची शक्ती गुरुंनी द्यावी असे सांगतानाच राजकीय जीवनात आपण जे काही मिळविले त्यामागे गुरुंचा मोठा आशीर्वाद असल्याचे यावेळी त्यांनी आवर्जून सांगितले.
सचखंडवाशी संत बाबा निधानसिंघजी, संत बाबा हरनामसिंघजी, संत बाबा आत्मासिंघजी व संत बाबा शिशा सिंघजी यांच्या सालाना बरसी निमित्त लंगर साहिब गुरुद्वारामध्ये मोठा धार्मिक सोहळा आयोजित केला असून या सोहळयास जगभरातून शीख धर्माचे धर्मगुरु व अनुयायी मोठया संख्येने नांदेडमध्ये आले आहेत. या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा भव्य दिव्य सोहळा संपन्न झाला.
मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर,
Add करा 9333333548 हा आमचा नंबर
Add करा 9333333548 हा आमचा नंबर
No comments:
Post a Comment