राष्ट्रवादी श्रेयवादासाठी घाई १५ वर्षा पेक्षा अधिक निधी भाजपा सरकारने दिला.

Saturday, August 4, 2018



आ सुजितसिंह ठाकूर यांचे खुल्या चर्चेचे आव्हान 

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विकासाचे राजकारण करण्याऐवजी सध्या श्रेयवादाचे राजकारण करण्यात मशगुल आहेत. भाजपाच्या केंद्र व राज्यातील शासनाकडून कामे मंजूर झाली किंवा निधी आला की,आम्ही आणले म्हणण्याचा सपाटा लावला आहे. आता तर राष्ट्रवादीच्या आमदारांनी चक्क मंजूर नसलेल्या भूम,परांडा,वाशी तालुक्यातील रस्त्यांच्या कामासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत १० कोटीचा निधी मंजूर करून घेतल्याच्या बातम्या दिल्या आहेत.ही कामे मंजूर व शासनाची प्रशासकीय मान्यता नसतानाच इतकेच काय तर,जे केलेच नाही त्याचे स्वतः चा फोटो टाकून फ्लेक्स/ग्राफीक्स करून सोशल मिडियात टाकले.आता तर श्रेयवादाची हद्दच पार केली यांनी.

राज्याच्या ग्रामविकास व महिला बालविकास मंत्री ना पंकजाताई मुंडे यांच्या कडे मुख्यमंत्री ग्रामसडक योजना व प्रधानमंत्री ग्रामसडक योजना हे विभाग आहेत.राष्ट्रवादीच्या आमदारांनी ज्या कामांची मंजूर व निधी आणला म्हणून प्रसिद्धी दिली आहे ती कामे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील नाहीत.मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत संशोधन व विकास या सदराखाली रस्ते दर्जोन्नतीची कामे घेता येतात.या कामांच्या लांबीचा कोटा ठरवून पदाधिकाऱ्यांच्या नावासह जिल्ह्याच्या संबंधित अधिकाऱ्यांना कळविले जाते.ना.पंकजाताई मुंडे यांनी आ.सुजितसिंह ठाकूर -२५ कि. मी.,आ.मधुकरराव चव्हाण -५ कि. मी.,आ ज्ञानराज चौगुले यांना ४.७० कि.मी. प्रमाणे कोटा दिला असून त्यातून आ.सुजितसिंह ठाकूर यांच्या शिफारशीने रस्त्यांची कामे प्रस्तावित असून ते कामांना अद्याप मंजुरी व निधी नाही.

राष्ट्रवादीच्या नेत्यांनी गल्ली ते दिल्ली सत्ता असताना काही केले असते तर,या भागातील जनतेला आज तुमच्या दुष्कर्माची फळे भोगावी लागली नसती.आता किमान फुकाचे श्रेय घेण्यासाठी श्रेयवादाचे राजकारण तरी करू नका.आघाडी सरकारच्या एकूण  १५ वर्षांपेक्षा अधिक निधी कमी काळात मुख्यमंत्री ना देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपा सरकारने या भागाला दिला आहे. विकास कामे व निधी या बाबतचे चर्चेचे खुले आव्हान आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी दिले आहे.

No comments:

Post a Comment