हिंगोली / प्रतिनिधी
येथील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आयोजित मुख्य स्वातंत्र्य दिनाच्या ध्वजारोहण कार्यक्रमाप्रसंगी जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप कांबळे यांनी महाराष्ट्र शासनाच्या मुखपत्र असलेल्या लोकराज्य स्टॉलला भेट देवून लोकराज्य मासिकाच्या अंकाची खरेदी केले. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी अरुण सुर्यवंशी यांनी पालकमंत्री श्री. कांबळे यांनी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत प्रकाशित महामानव हा ग्रंथ भेट दिला.
शासनाच्या योजना, उपक्रम आणि शासनाच्या कार्याची माहिती होण्यासाठी जास्तीत-जास्त नागरिकांना लोकराज्य मासिकाचे वर्गणीदार होण्याचे आवाहन ही पालकमंत्री कांबळे यांनी यावेळी केले. यावेळी आमदार तान्हाजी मुटकुळे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शिवराणीताई नरवाडे, नगराध्यक्ष बाबाराव बांगर, जिल्हाधिकारी अनिल भंडारी, पोलीस अधिक्षक योगेश कुमार, अप्पर जिल्हाधिकारी जगदिश मिनियार, निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा पुरवठा अधिकारी लतीफ पठाण, जिपचे अतीरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मुकीम देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.
No comments:
Post a Comment