लातूर / प्रतिनिधी
भाजपाचे संघटनमंत्री विजय पुराणिक हे नांदेड व लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यांवर येत आहेत. त्यांचा महाराष्ट्राचे भाजपाचे संघटनमंत्री झाल्यानंतरचा हा पहिलाच दौऱ्यांवर येत आहेत. दैनिक मराठवाडा नेताच्या वतीने त्यांना शुभेच्छा.
विजय पुराणिक हे मुळ कोकणातील आहेत. 1987 पासून ते संघ प्रचारक म्हणून कार्य करतात. प्रथमत: ते मुरबाड तहसील क्षेत्रात संघ प्रचारक होते. धुळे, अहमदनगर जिल्हा प्रचारक म्हणून त्यांनी जबाबदारी पेलविली आहे. ते काही काळ औरंगाबाद व लातूर जिल्ह्याचे संघ प्रचारक होते. देवगिरी प्रांताचे सहप्रचारक व प्रचारक म्हणून त्यांनी कार्य केले आहे. पश्चिम भारत अंतर्गत गुजरात, महाराष्ट्र व गोवाचे ते प्रचारक होते. त्यांचा संघाच्या सर्व ज्येष्ठ नेत्यांशी थेट संपर्क आहे. गेल्या काही महिन्यांपुर्वी त्यांनी भाजप प्रदेश संघटनमंत्री म्हणून त्यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. सकाळी त्यांची नांदेड येथे बैठक होती. दुपारी ते भाजप पदाधिकारी व लोकप्रतिनिधीं समवेत त्यांची बैठक आहे.
येणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत कार्यकर्त्यांना कानमंत्र देतील व ज्या परिस्थितीत भाजपाचे आणखीन बळ वाढेल. विजय पुराणिक हे संघटनमंत्री म्हणून जरी पहिल्यांदा येत असले तरी त्यांना पुर्ण लातूरसह महाराष्ट्राची माहिती आहे. प्रदेश संघटनमंत्र्यास भाजपात खुप अधिकार असतात. त्यांच्या नेतृत्वास संघटना बलशाली व्हावी व अच्छे दिन यावेत हिच अपेक्षा.
No comments:
Post a Comment