भाजपा मेळाव्याची रामवाडीत जय्यत तयारी कार्यकर्त्यात मोठया उत्साहाचे वातावारण

Friday, August 31, 2018

रेणापूर, दि. 31 – लोकसभा निवडणूक पुर्व तयारीच्या अनुशंगाने सोमवार, दि. 3 सप्टेंबर रोजी रेणापूर तालुक्यातील रामवाडी येथे होत असलेल्या भारतीय जनता पार्टीच्या बुथप्रमुख व कार्यकर्त्यांच्या मेळाव्याची जय्यत तयारी सुरु झाली असून या मेळाव्यात जिल्ह्याचे पालकमंत्री ना. संभाजीराव पाटील निलंगेकर हे कार्यकर्त्यांना काय कानमंत्र देणार याकडेसर्वांचे लक्ष लागले आहे.

रेणापूर तालुक्याची ओळख भाजपाचा बालेकिल्ला म्हणून सर्वत्र आहे. लोकनेते स्व. गोपिनाथराव मुंडे यांचे नेतृत्व लाभल्यामुळे रेणापूरचे नाव देश पातळीवर पोहचले. रेणापूरमतदारसंघाची पुर्नरचना होऊन लातूर ग्रामीण मतदार संघात रेणापूर तालुक्याचा समावेश झाला. दरम्यान या मतदारसंघाची जबाबदारी स्व. गोपिनाथराव मुंडे यांनी भाजपाचे लातूरग्रामीणचे नेते रमेशअप्पा कराड यांच्याकडे सोपवली. गेल्या दहा-बारा वर्षात कराड यांनी वाडी-तांडयापासून गावपातळीपर्यंत सर्वसामान्य कार्यकर्त्यांना सोबत घेवून पक्षाची बांधणी केली.विधानसभा निवडणूकीत अपयश आले असले तरी खचुन न जाता जनतेच्या सतत सुख-दु:खात सोबत राहिल्याने रेणापूर तालुक्यातील पंचायत समिती, नगरपंचायत यासह अनेकमहत्वाच्या संस्था सध्या कराड यांच्या नेतृत्वात भाजपाच्या ताब्यात आहेत.

पुढील वर्षी लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. या लोकसभा निवडणूकीच्या अनुशंगाने रेणापूर तालुक्यतील भाजपाच्या बुथ प्रमुख व कार्यकर्त्यांचाजिल्ह्यातील पहिला मेळावा रामवाडी येथे होत आहे. मेळाव्याचे उद्घाटन पालकमंत्री ना. संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी लातूर ग्रामीणचे नेतेरमेशअप्पा कराड हे राहणार आहेत. मेळाव्यात विधान परिषदेचे नुतन सदस्य आ. सुरेश धस यांचा जाहिर सत्कार करण्यात येणार आहे. या प्रसंगी भाजपाचे गोविंद केंद्रे, जिल्हाध्यक्षनागनाथ निडवदे, खा. सुनिल गायकवाड, शैलेश लाहोटी, आ. विनायकराव पाटील, आ. सुधाकर भालेराव, जि.प. अध्यक्ष मिलींद लातूरे, उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके, महापौर सुरेश पवार,उपमहापौर देविदास काळे, जि.प.चे सभापती संजय दोरवे, प्रकाश देशमुख, बजरंग जाधव, सौ. संगिता घुले, अमित रेड्डी, उत्तराताई कलबुर्ग यांच्यासह जिल्ह्यातील सर्व भाजपाचेपंचायत समिती सभापती, सर्व नगराध्यक्ष आणि जिल्हा परिषद सदस्य उपस्थित राहणार आहेत.

या मेळाव्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये मोठया प्रमाणात उत्साह संचारलेला असून मेळाव्यासाठी भव्य मंडपाची उभारणी करण्यात येत आहे. पावसाळ्याचे दिवस असल्याने वॉटरप्रुफमंडप तसेच स्वागत कमानी उभारल्या जात आहेत. जागो-जागी मेळाव्याचे होर्डींग लावण्यात आले असून या मेळाव्यास रेणापूर तालुक्यतील सर्व बुथ प्रमुख व कार्यकर्त्यांना सहभागीकरण्यासाठी प्रमुख कार्यकर्ते सर्व गावा-गावात जावुन निमंत्रण देत आहेत. रामवाडी येथील मेळावा कार्यकर्त्यांना दिशादर्शक ठरणार असून या प्रसंगी पालकमंत्री काय बोलणार याकडेअनेकांचे लक्ष लागले आहे. एकुणच या मेळाव्यामुळे मात्र भाजपा कार्यकर्त्यात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.

मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी भाजपचे ॲङ दशरथ सरवदे, पं.स. सभापती अनिल भिसे, उपसभापती अनंत चव्हाण, जि.प. सदस्य सुरेश लहाने, वसंत करमुडे, डॉ. बाबासाहेब घुले,रमेश सोनवणे, सतीश अंबेकर, रेणापूरचे नगराध्यक्ष अभिषेक अकनगिरे, श्रीकिशन जाधव, रमाकांत फुलारी, संतोश चव्हाण, नरसिंग यलगटे, सौ. ललिता कांबळे, विजय चव्हाण, दत्तासरवदे, उज्वल कांबळे, श्रीकृष्ण मोटेगावकर, अनिल यलगटे, विठ्ठल कसपटे, भाऊसाहेब गुळभीले, श्रीकृष्ण पवार, ‍दिनकर रोठोड, राजु अत्तार, श्रीमंत नागरगोजे, लक्ष्णम खलंग्रे, अजीमशेख, सुरेश बुड्डे, संगमेश्वर तत्तापुरे, राजकुमार मानमोडे, प्रल्हाद फुलारी, शालिक गोडभरले, चंद्रकांत गोडभरले, श्रीनिवास उगीले, राजकुमार आलापुरे, बाळु दिवटे, व्यंकट कुटवाड,ग्याना तोपटे, प्रशांत जाधव, हनुमंत भालेराव, राहुल गोडभले आदी परिश्रम घेत आहेत.

मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर, 
Add करा 9333333548 हा आमचा नंबर

No comments:

Post a Comment