लातूर । प्रतिनिधी
मराठा आरक्षण व अन्य मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने 9 ऑगस्ट रोजी होणाऱ्या जनआंदोलनात पक्षीय ओळख बाजूला ठेवून सहभागी होण्याचा व आंदोलन यशस्वी करण्याचा निर्धार स्थानिक स्वराज्य संस्थांतील लोकप्रतिनिधींनी सोमवारी केला.
यासंदर्भात मराठा क्रांती भवनाथ जिल्हा परिषद ,पंचायत समिती सदस्य, महापौर, नगरसेवक, बाजार समिती सदस्य व सहकारी साखर कारखाना संचालकांची व्यापक बैठक घेण्यात आली. आपापल्या मतदारसंघातील समाज बांधवांसह आंदोलन दिनी रस्त्यावर बैठक घेण्याचे ठरले. हे आंदोलन अधिक व्यापक व परिणामकारक करण्यासाठी करावयाच्या उपाययोजना व घ्यावयाची काळजी यावरही सविस्तर विचार मंथन या बैठकीत झाले. लोकप्रतिनिधी आपापल्या मतदारसंघातील वार्डातील गट व गणातील समाजबांधवांच्या तसेच ग्रामपंचायत सदस्यांच्या भेटी घेणार आहेत.आंदोलनात महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी महिला लोकप्रतिनिधी सक्रिय राहणार असल्याचे मराठा क्रांती च्या वतीने यावेळी सांगण्यात आले बैठकीस मोठ्या संख्येत प्रतिनिधींची उपस्थिती होती
आमदार-खासदारांनी सहभागी व्हावे
मराठा समाजाच्या न्याय मागण्यासाठी होत असलेल्या या जनआंदोलनात मराठा समाजातील आमदार-खासदारांनी पक्षीय अभिनिवेश बाजूला ठेवून सहभागी व्हावे, असे आवहान या बैठकीतून करण्यात आले
No comments:
Post a Comment