हिंगोली / प्रतिनिधी
माजी नगराध्यक्ष तथा हिंगोलीचे उपनगराध्यक्ष दिलीप चव्हाण यांच्या वाढदिवसानिमीत्त 15 ऑगस्ट रोजी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या वतीने जिल्हाभरात भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

हिंगोलीचे उपनगराध्यक्ष, महाराष्ट्र स्टेट हाऊसिंग फायनान्सचे संचालक तथा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष दिलीप चव्हाण यांच्या वाढदिवसानिमीत्त 15 ऑगस्ट रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये सकाळी 7 वाजता जलेश्वर मंदिर येथे अभिषेक त्यानंतर मुकबधीर विद्यालयात अन्नदान, शासकीय रूग्णालयात रूग्णांना फळ वाटप, देवडा अंध विद्यालयात शैक्षणिक साहित्य व खाऊचे वाटप तसेच कमला नगर येथे सत्कार कार्यक्रम, महावीर नगर येथे वृक्षारोपण आदी ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दिलीप चव्हाण यांच्या वाढदिवसानिमीत्त शहरात ठिकठिकाणी शुभेच्छांचा वर्षाव करणारे डिजीटल बॅनरही लावण्यात आले आहेत.
No comments:
Post a Comment