![]() |
| लातूर येथे अटल बिहारी बाजपेयी आले असताना त्यांच्या समवेत प्रकाश पाठक |
लातूर:मराठवाडा नेता
माजी पंतप्रधान आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते अटल बिहारी वाजपेयी राजकारणातील एक उत्तुंग व्यक्तिमत्व .राजकीय पदामुळे त्यांचं वलय विस्तारलेलं असलं तरी लेखक आणि कवी म्हणून त्यांचं विश्व वेगळच होत. त्यामुळेच त्यांची भाषणे ऐकणे वेगळीच अनुभूती असायची .सुदैवाने लातूरकरांना वाजपेयींचे भाषण ऐकायला मिळालेले आहे अटलजीनी त्या दौऱ्यात विवेकानंद रुग्णालयात मुक्कामही केला होता .
आर्य समाज शताब्दी महोत्सवासाठी अटल बिहारी वाजपेयी लातुरात आले होते.सध्या उच्च न्यायालयात मुख्य न्यायमूर्ती असलेले नरेश हरिश्चंद्र पाटील या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष होते . त्यावेळी राजस्थान विद्यालयाच्या मैदानावर त्यांची सभा झाली होती. वाजपेयींना ऐकण्यासाठी जिल्हाभरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती .यावेळी अटलजींचे भाषण सुरू होण्यापूर्वी 'देश का नेता कैसा हो अटल बिहारी जैसा हो' अशा घोषणांनी परिसर दणाणला होता .यादरम्यानच अटल बिहारी वाजपेयी बोलायला उभे राहिले. लातूरकरांनी दिलेल्या घोषणांचा धागा पकडूनच' देश का नेता कैसा हो 'असे म्हणण्यापेक्षा 'देश कैसा हो 'ये मेरा सवाल है असे ते म्हणाल्याची आठवण आज अनेकांनी जागवली .स्वतः पेक्षा देश मोठा आहे याची जाणीव त्यांनी त्यावेळी उपस्थितांना करून दिली होती. एवढेच नव्हे तर आयुष्यभर ही जाणीव कायम ठेवूनच ते वावरले. अटलजींचा तो एकमेव लातूर दौरा लातूरकरांच्या कायमच स्मरणात राहणारा आहे.
याच दौऱ्यात अटलजीनी विवेकानंद रुग्णालयात मुक्काम केला होता सध्या स्वीकृत नगरसेवक असणारे प्रकाश पाठक यांच्याकडे अटलजींची व्यवस्था पाहण्याची जबाबदारी होती सकाळी अटलजी स्नानाला निघाले तेंव्हा त्यांनी अंगातील बनियन काढून ठेवले प्रकाश पाठक यांनी त्या बनियनची घडी घालण्यासाठी ते घेतले लागलीच अटलजीनी पाठक यांच्याकडून ये घेतले हमारा काम हम करेंगे असे सांगत त्यांनी स्वतःत्याची घडी घातली अशी आठवण प्रकाश पाठक आजही सांगतात .
मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर,
Add करा 9333333548 हा आमचा नंबर

No comments:
Post a Comment