ठन गई मौत से ठन गई अटल युगाचा अस्त

Thursday, August 16, 2018


भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांचे निधन एम्समध्ये घेतला अखेरचा श्वास


नवी दिल्ली :देशाचे पंतप्रधानपद तीन वेळा भूषविणारे भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांचे गुरुवारी सायंकाळी निधन झाले .एम्स रुग्णालयात सायंकाळी पाच वाजून पाच मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

जनसंघ आणि भारतीय जनता पक्षाची स्थापना करून या पक्षाला सत्तेपर्यंत पोचविणारे राजकारणाच्या माध्यमातून जनतेची सेवा करणारे वाजपेयी निवर्तल्यामुळे अटल युगाचा अस्त झाला आहे . 11 जून रोजी अटलजींना एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. गेल्या काही दिवसात त्यांची प्रकृती बरोबर नसल्यामुळे एम्स मध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते .मागील 36 तासात वाजपेयी यांची प्रकृती अधिकच ढासळली .त्यामुळे त्यांना जीवरक्षक प्रणालीवर ठेवण्यात आले होते. एम्समधील डॉक्टरांची टीम त्यांच्या त्यांच्यावर उपचार करत होती .वाजपेयी यांच्या प्रकृतीविषयी ठराविक कालावधीनंतर मेडिकल बुलेटीन जारी करण्यात येत होते. वाजपेयी जीवरक्षक प्रणालीवर असल्याचे समजल्यापासून एम्समध्ये देशभरातील मान्यवर नेते व कार्यकर्त्यांची रीघ लागली होती .पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह तसेच अनेक केंद्रीय मंत्र्यांनी दिवसभरात रुग्णालयामध्ये जाऊन वाजपेयींच्या प्रकृतीची चौकशी केली . लोकसभेच्या अध्यक्ष सुमित्रा महाजन ,ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, उत्तर प्रदेश चे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे ,छत्तीसगडचे रमण सिंह ,बसपाच्या मायावती यांनी रुग्णालयात जाऊन चौकशी केली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी हे देखील एम्स कडे रवाना झाले होते. दिवसभरात वाजपेयींच्या प्रकृतीबाबत चौकशी करण्यासाठी अन अनेक जण रुग्णालयात आले .


सायंकाळी पावणे सहा वाजण्याच्या सुमारास रुग्णालयाच्या वतीने वाजपेयी आता आपल्यात राहिले नसल्याची माहिती देण्यात आली .दुपारी वाजपेयींची तब्येत काहीशी सुधारल्याची वार्ता येत होती परंतु त्यानंतर ती पुन्हा बिघडली आणि त्यातून ते बाहेर पडू शकले नाहीत .सायंकाळी वाजपेयी यांचे पार्थिव कृष्ण मेनन मार्गावरील त्यांच्या शासकीय निवासस्थानी नेण्यात येणार आहे .सायंकाळी होणाऱ्या कॅबिनेटच्या बैठकीत शासनाच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करून अंत्यसंस्कारा संदर्भात माहिती देण्यात येणार आहे .पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्विट करून वाजपेयी यांच्या निधनाची माहिती दिली. 

भावूक झालेल्या मोदी यांनी सात वेळा ट्विट केले .अटलजी अब नही रहे .भावनाओं का अंबार उमड रहा है अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. राष्ट्रपती रामनाथ कोविंद ,राहुल गांधी यांच्यासह अनेकांनी अटलजींना श्रद्धांजली अर्पित केली .ठन गई मौत से ठन गई ही अटल बिहारी वाजपेयी यांची कविता खूप प्रसिद्ध होती .या कवितेप्रमाणेच आज अटलजी ही सर्वांना सोडून गेले .मृत्यूचे वास्तव आपल्या शब्दातून व्यक्त करणारे , अद्वितीय, प्रतिभा संपन्न ,दूरदर्शी राजकारणी, प्रखर देशभक्त व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेले.

सायंकाळी ७.३० वाजता वाजपेयी यांचे पार्थिव निवासस्थानी नेले जाणार आहे शनिवारी १८ ऑगस्ट रोजी राजघाटाच्या मागील बाजुस त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार असल्याची माहिती सुत्रां नी दिली

मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर, 
Add करा 9333333548 हा आमचा नंबर

No comments:

Post a Comment