नायगाव बाजार : पंडित वाघमारे
नायगावपासून दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या मांजरमजवळ नदीला आलेल्या पाण्यात तवेरा गाडी वाहून गेल्याने बरबडा येथील पती,पत्नीसह चिमुकलीचा मृत्यु झाला तर दुसऱ्या घटनेत मांजरम येथील तरुणाला मोटारसायकलसह जलसमाधी मिळाल्याने मांजरम व बरबडा गावावर शोककळा पसरली आहे. सदरची घटना २० आँगस्ट रोजी रात्री १० वाजताच्या दरम्यान घडली.
नायगाव तालुक्यातील बरबडा येथील गंगाधर मारोती दिवटे हा बहीणीच्या घरी मांजरम येथे मावंद्याचा कार्यक्रम असल्याने मित्राची तवेरा गाडी घेवून पत्नी पारुबाई व आपल्या आठ वर्षाच्या मुलीला घेवून आला होता. मावंद्याचा कार्यक्रम झाल्यानंतर परत जायला निघाला मात्र पाऊस पडत आहे सकाळी लवकर जा असे काहीनी सुचवले पण गाडी मित्राची असल्याने जावे लागणार म्हणून निघाला. पण मांजरमजवळच असलेल्या नांदेड रोडवरील नदीला पुर आला होता. पण पुराच्या पाण्याचा पुरेसा अंदाज न घेता तवेरा पाण्यात घातली. पाण्याचा प्रवाह जोरात असल्याने तवेरा गाडीच पाण्यात वाहून गेली. यात पती, पत्नी व आठ वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला. ही घटना मांजरम येथे समजताच गावकऱ्यांनी धाव ढेतली असता रात्री १ वाजताच्या दरम्यान तिघांचेही मृतदेह सापडले.
दुसऱ्या घटनेत मांजरम येथीलच एक तरुण रुग्णालयात बाळंत झालेल्या आपल्या बहीणीला जेवनाचा डब्बा देवून नायगाव येथून मांजरमकडे बेंद्री मार्गे येत असतांना एका नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात विनायक बालाजी गायकवाड हा तरुण मोटारसायकलसह वाहून गेला. रात्री उशिरा बेंद्री शिवारात विनायक गायकवाड यांचा मृतदेह सापडला.मांजरम जवळच्या नदीत वाहून गेलेल्या चारही जनांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नायगावच्या ग्रामीण रुग्णालयात आणले आहेत.
मांजरमला बहीणीच्या घरी मावंद्याचा कार्यक्रम असल्याने पत्नी व मुलीसह जायचे होते त्यामुळे जाण्यासाठी गोविंद सुवर्णकार या मित्राची एम.एच.३७, जी ५६११ या क्रमांकाची तवेरा गाडी मागून घेतली होती. याच तवेरा गाडीतून परत येत असतांना काळाने घाला घातला. या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत तहसीलदार सुरेखा नांदे.जनतेनी पावसात बाहेर निघुन नये आसे आसे आव्हान तालुका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर,
Add करा 9333333548 हा आमचा नंबर
Add करा 9333333548 हा आमचा नंबर
No comments:
Post a Comment