ऊस शेतीला उर्जित अवस्थेसाठी शंभर टक्के आयात 20 लाख टन साखर निर्यातीस परवानगी : मोदी

Saturday, July 21, 2018

शहाजापूर / प्रतिनिधी
ऊस शेतीला उर्जित अवस्था येण्यासाठी साखरेच्या आयातीला शंभर टक्के आयात शुल्क तर 20 लाख टन साखर निर्यातीस परवानगी दिली आहे. व वेगवेगळ्या 14 शेतीमालाचे दर 200 ते 1800 रूपयांनी वाढ करण्यात आल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उतर प्रदेशातील शहाजापूर येथील शेतकरी मेळाव्यात बोलताना केले. व्यासपीठावर उतर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथजी, उपमुख्यमंत्री मौर्य, केंद्रीय मंत्री मनिका गांधी हे होते. 


आमची नियत साफ आहे. या भुमिचे महत्व म्हणजे खेत की ज्योती से लेकर राष्ट्र की हित के लिए परिश्रम करणे वाले किसान यहां के है. सरकारचा निर्णय हा शेतकऱ्यांच्या हिताचा आहे. धान, मका, दाळ, तेलसह विविध पदार्थाचे दोनशे रूपयांपासून आठशे रूपयांपर्यंत किमती वाढविण्यात आल्या आहेत. विरोधकांना संधी होती. पण त्यांनी ते केले नाही. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अधिकात अधिक भाव मिळावा म्हणून आमचा प्रयत्न आहे. आणि याचाच एक भाग म्हणून साखर आयातीवर शंभर टक्के आयात कर 20 लाख टन साखर निर्यातीस परवानगी दिली आहे. साखरेचा उतारा दहा असताना कमीत कमी 261 रूपये क्विंटल भाव देण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांच्या घामाचा आणि श्रमाचा सन्मान करणे हा आमचा उद्देश आहे. आमची प्राथमिकता ही शेतकरी आहे. 5 कोटी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय आहे. त्याचप्रकारे गेल्या एक ते दिड महिन्यात सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे पेमेंट झालेले आहे. शेतकऱ्यांचा एक एक पैसा वेळेवर दिला जावा. हा आमचा प्रयत्न आहे. ऊसापासून फक्त साखरच नाही. इथेनॉल निर्माण होते. इथेनॉलच वाहनाला पेट्रोल म्हणून वापर करता येते. चार वर्षापुर्वी चाळीस कोटी इथेनॉल तयार व्हायचं 160 कोटी लिटर म्हणजे चौपट उत्पादन होत आहे.

अनेक दशकापासून अडक लेले शंभर सिंचन प्रकल्प लवकरात लवकर व्हावेत यासाठी आम्ही क्रांतीकारक निर्णय घेतला आहे. आणि त्याला 80 हजार कोटी रूपयांची तरतुद केली आहे.
इथला शेतकरी शेतीला पाणी दिलं. तर मातीतून सोनं तयार करतो असे सांगून पंतप्रधान मोदी म्हणाले, येणाऱ्या काळात शेतकऱ्यांना युरिया खतासाठी काठ्या खाव्या लागणार नाहीत. आमचं सरकार हे गरीबांच, कष्टकऱ्यांच सरकार आहे. आणि मोदी सरकार हे 8 करोड माता-भगिनींना एलपीजी गॅस मोफत दिला आहे. 5 लाख शौचालये बांधण्यात आली आहेत. 2 कोटी पक्की घरे होत आहेत. छोट्या उद्योगासाठी बिना तारणांचे 13 करोड रूपये कर्ज दिले आहे असंही म्हणाले.

कॉंग्रेसचे पंतप्रधान म्हणाले होते एक रूपया गावाच्या विकासासाठी पाठविला तर वाटेत 85 पैसे हे वाटमारी व्हायची हे मी नाही सांगत जेव्हा देशात आणि राज्यात कॉंग्रेसचे सरकार होते. त्यांच्या प्रधानमंत्र्यांनी हे सांगितलंय. तिथे आम्हाला इंट्री सुद्धा नव्हती असं सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले रस्त्याच्या भ्रष्टाचार, घोटाळ्यांचे दुकान बंद झाले आहे. जे सरकारवर अविश्वास ठराव आणतात त्यांनी 2024 च्या अविश्वास ठरावाची तयारी करावी असंही पंतप्रधान मोदी म्हणाले. आज 4 कोटी गावात वीज पोहोचलेली आहे. विरोधक म्हणतात गावात पोहोचली घरात पोहोचली का. आम्ही काम करत आहोत दलित, पिडीत, वंचित लोकांना न्याय देण्याचा आमचा प्रयत्न आहे. आणि यामुळे हे लोक टिका करत आहेत. भाईयो और बहेनो तुम्हीच सांगा भ्रष्टाचाराविरोधात, घराणेशाहीविरोधात मी काम करतोय हा माझा गुन्हा आहे का, लाल दिवा लावून लोकांना अडवणुुक करणारे, रूबाब करणाऱ्यांना मी लाल दिवा काढला हा मी गुन्हा केला का अशा प्रकारे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

खेत की सिचाई, गरीबो को दवाई, विद्यार्थीयों को पढाई और युवको को कमाई ही आमची भुमिका आहे. माझी लढाई, अहंकार, दमन आणि दंभाच्या विरोधात आहे. वेळ बदलत आहे. देश बदलत आहे आणि जनता जनार्धनाच्या मंदिरात मला जोपर्यंत आशिर्वाद आहे तोपर्यंत चिंता नाही. बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेप्रमाणे मी काम करतोय हा माझा गुन्हा आहे का असा सवाल करून पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. उद्याच्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर त्यांनी काल संसदेत आपल संख्याबळ तपासले आहे. त्याना त्यांची जागा कळली असेलच.

मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर, 
Add करा 9333333548 हा आमचा नंबर

No comments:

Post a Comment