पीक विमा : दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यावर कार्यवाही करावी: आ विनायकराव पाटील

Friday, July 20, 2018

आ विनायकराव पाटील यांची विधानमंडळाच्या सभागृहात
 औचित्याच्या मुद्द्याद्वारे मागणी

नागपूर दि प्रतिनिधी -
नागपुर येथे नुकत्याच चालू असलेल्या अधिवेशनादरम्यान विधीमंडळाच्या सभागृहात आमदार श्री विनायकराव पाटील यांनी मतदार संघातील चाकुर तालुक्यातील वडवळ व अहमदपूर तालुक्यातील शिरूर व खंडाळी मंडळा अंतर्गत शेतकरी बांधवांना अतिशय अल्प प्रमाणामध्ये पिक विमा आला होता काही महसूल मंडळात अनियमितता आढळून आली होती संबंधित विभागाच्या चुकीच्या व मनमानी स्वरूपाचा कार्यपद्धतीमुळे शेतकरी पिक विम्याच्या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम अत्यंत तुटपुंज्या स्वरूपाची असल्याने शेतकऱ्यांना तातडीने भरीव स्वरूपाची मदत देण्याची आवश्यकता असल्याची मागणी केली त्याचप्रमाणे पिक विमा योजनेतून वगळन्यात आलेल्या गावांना तातडीने मदत देणे व संबधित विभागाच्या दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यावर कार्यवाही करण्याची मागणी केली पिक विमा हा शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. 

एकीकडे निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांच्या हाती पीक लागत नाही . दुसरीकडे विमा कंपनी आणि संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी शेतकऱ्यांना खिंडीत गाठत आहे. पिक विम्याचा विषय गुरूवारी भाजप आमदार विनायकराव पाटील यांनी नागपुर येथिल अधिवेशनात उपस्थित केला. 

जिल्ह्यातील शेती हंगामी आणि पावसावर अधारित असल्याने शेतकरी प्रधानमंत्री पिक विमा योजनेत मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतात. विमा भरण्यासाठी शेतकऱ्यांना कसरत तर करावीच लागते. शिवाय पिक संरक्षण हप्त्यापोटी मोठी रक्कमही भरावी लागते. मात्र, पिक विमा कंपनीची वक्रदृष्टी आणि शासनाच्या विविध विभागांच्या हलगर्जीपणाचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. संबधित विभागाच्या दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यावर कार्यवाही करण्याची मागणी आ.विनायकराव पाटील यांनी गुरुवारी नागपूर अधिवेशनात हा विषय औचित्याच्या मुद्द्याद्वारे उपस्थित केला

आ विनायकराव पाटील हे अत्यंत विनम्रतेने सर्वसामान्यांसोबत राहून विकासाची कामे करत आहेत नुकतंच मुख्यमंतयाचे हस्ते छत्रपती शिवरायांचे उदघाटन झाले चापोली येथे समाज मंदिर आहि रस्त्यासाठी ३० लाखाचा निधी तर चाकूर येथे छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची लवकरच उभारणी करणार असल्याचे जाहीर केले आहे . आमचा प्रतिनिधी कळवतो कि अनेक अडथळे असताना केंद्र आणि राज्य सरकारकडून राष्ट्रीय महामार्ग , तसेच ग्रामीण विकासाचे रस्ते या सह विविध कामे केली जाणार आहेत अत्यंत संयमी विनम्र व लोकांच्या सुख दुःखात धावून जाणारे म्हणून त्यांच्या संदर्भात संपूर्ण मतदार संघात सकारत्मक मत आहे विरोधक अनेक अधथळे आणण्याचा प्रयत करत असताना बाते काम काम जादा या भूमिकेतून काम करत आहेत . सर्वात आश्चर्य म्हणजे कोणतीही कसलीही संस्था त्याच्या ताब्यात नाही 

मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर, 
Add करा 9333333548 हा आमचा नंबर

No comments:

Post a Comment