महाराष्ट्रात महिला अत्याचारात ३० टक्के वाढ : चित्रा वाघ

Thursday, July 12, 2018

लातूर दि प्रतिनिधी -
महाराष्ष्ट्रातील महिलांच्या शारीरिक , लैंगिक अत्याचारात ३० टक्के वाढ झाली असून गेंड्याच्या कातडीचे सरकार महिलांविषयक असणाऱ्या कायद्याची नीटपणे अंमलबजावणी करत नाही अशी टीका राष्ट्रवादी महिला काँग्रेस च्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषदेत केली 

महिला सुरक्षे बाबत यंत्रणा  आणि व्यवस्थांची जबादारी निश्चित करून व्यापक जनमत तयार करण्यासाठी आम्ही महिला सेफ्टी ऑडिट अभियान सुरु करत आहोत असेही त्या म्हणाल्या.  

महिला व लहान मुलींवरील वाढते अत्याचार हा चिंतेचा विषय बनला असून महिला सुरक्षा अभियानातून गावस्तरावर दबाव गट निर्माण करणे हाच उद्देश असल्याचे नमूद करून चित्रा वाघ म्हणाल्या महिला सुरक्षा हि खासगी बाब राहिली नसून ती सर्वांची जबादारी आहे.  त्या दृष्टीने गाव , वार्ड ,सुरक्षित करणे आवश्यक आहे महिलांसाठी असुरक्षित ठिकाणे सुरक्षित कशी होतील हे पाहावे लागेल असे त्या म्हणाल्या 

आजही दररोज ३० ते ३५ मुलींना अश्लीलतेला सामोरे जावे लागत आहे हे आम्ही नाही सरकारचीच आकडेवारी सांगते , महिलाविषयक क्राईम रेट प्रचंड वाढला आहे अशा शब्दात त्यांनी सरकारला धारेवर धरले.  राज्यात कायदा सुवेवस्थेचा पूर्णपणे बोजवारा उडाला असून सरकार केवळ जाहिरात बाजी आणि नारेबाजीत व्यस्त असल्याची हि टीका त्यांनी केली 

मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर, 
Add करा 9333333548 हा आमचा नंबर 

No comments:

Post a Comment