मुंबई दि प्रतिनिधी
येथे पीक विम्या संदर्भात पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या पुढाकाराने विमा अधिकाऱ्याची बैठक झाली त्या मुळे 1लाख 71 हजार शेजाऱ्यांना 57 कोटी रुपयाचा पीक विमा वर्ग केल्याचे पत्र विमा कंपनीने दिल्याची माहिती व पत्र भाजपा युवा नेते अरविंद भैय्या पाटील निलंगेकर यांनी मराठवाडा नेता ला बोलताना दिली .
अगोदर चा पीकविमा 134 कोटी व अधिकचे 57 कोटी असे ऐकून 191 कोटी रुपये पीक विम्याचे मंजूर झाले आहेत व ते संबधित बँकेकडे वर्ग झाले आहेत आणखीन 40 कोटी पीक विमा येणाऱ्या 2 आठवड्यात तो वर्ग केला जाईल आतापर्यंत 4 लाख 71 हजार शेतकऱ्यांना पीकविमा वर्ग झाल्याचे अरविंद पाटील निलंगेकर यांनी सांगितले ऐकून 331 कोटी रुपये पीक विमा मंजूर झाला असताना फक्त 134 कोटी च वर्ग करण्यात आला होता बैठकीत विमा अधिकाऱ्यांनी मान्य केले की जिल्हा बँकेकडे कुशल कर्मचारी नसल्यामुळे पीकविमा भरणाऱ्या शेतकऱ्यांची माहिती वेळेत न मिळाल्या मुळे हा पीक विमा मंजूर होऊन सुद्धा वर्ग करण्यात आला नव्हता एकंदरीत आता पर्यंत 291 कोटी रुपये पीक विमा पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांचा पाठपुरावा व इन्शुरन्स अधिकाऱ्याच्या प्रयत्नामुळे मंजूर झाला आहे
या मुळे शेतकऱ्याच्या प्रश्ना संदर्भात पालकमंत्र्यांनी सतर्कता दाखवल्याबद्दल शेतकरी त्यांना धन्यवाद देत आहेत तसेच राहिलेले 40 कोटी रुपये येनाऱ्या काळात लवकरात लवकर मिळावेत अशीही अपेक्षा शेतकरी करत आहेत
मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर,
Add करा 9333333548 हा आमचा नंबर
No comments:
Post a Comment