वसमत तालुक्यातील पांगरा बोखारे येथील घटना.
ज्ञानेश्वर लोंढे / हिंगोली
वसमत तालुक्यातील पांगरा बोखारे येथील जिल्हा परिषद शाळेच्या किचनमध्ये चक्क ६० साप आढळून आले. या घटनेने घाबरून न जाता तेथील शिक्षक आणि ग्रामस्थांनी सर्पमित्राच्या सहकार्याने घोणस जातीच्या सापासह ६० पिल्लांना जीवदान दिले.
वसमत तालुक्यातील पांगारा बोखारे
येथील जिल्हा परिषद शाळेत दि १२ जुलै रोजी सकाळी स्वयपाकघरात ६० सापांची पिल्लं आणि एक साप आढळून आल्यानंतर अनेकांना घाम फुटला. घाई गरबडीत काही जणांनी साप मारण्याचा प्रयत्न केला होता परंतु मुख्याध्यापक त्र्यंबक भोसले आणि भिमराव बोखारे यांच्यासह काही ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन साप न मारण्याचा निर्णय घेत. वसमत येथील सर्पमित्र विक्की दयाळ आणि त्यांचा सहकारी बाळासाहेब भालेराव यांच्याशी संपर्क साधून त्यांना बोलावण्यात आले. तोपर्यंत सापांनी बनवलेले घर पाहण्यासाठी सारा गाव जिल्हा परिषद शाळेत पोहोचला होता. दरम्यान सर्पमित्रांनी दोन तास परिश्रम घेत साप बाटलीबंद केले. ग्रामीण भागात साप आढळणे ही फार मोठी गोष्ट नाही ,परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणात साप आढळून येणे आणि तेही शाळेत ही तालुक्यातील नव्हे तर जिल्ह्यातील पहिली घटना असावी, अशी चर्चा परिसरात रंगली होती. दरम्यान, ग्रामस्थांच्यावतीने मुख्याध्यापक टी. डी. भोसले यांच्या हस्ते सर्पमित्रांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
No comments:
Post a Comment