नागपूर : दि प्रतिनिधी
लातूर शहरासाठी भाजप सरकारने खुश खबर दिली आहे अनेक वर्षापासून रखडलेल्या शादीखाना , सोलार नाट्यगृहासाठी भरीव आर्थिक तरतूद पुरवणी मागणी विधेयकात मंजूर करण्यात आली आहे नागपूर येथे सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनात दोन्ही सभागृहात हे विधेयक मंजूर झाले आहे आहे .
लातूर शहर महानगर पालिकेच्या वतीने सोलर प्रकल्प उभारण्यासाठी राज्यशासनाने १६ कोटी नाट्य
गृहासाठी १५ कोटी तर मुस्लिम समाजाच्या दृष्टीने जिव्हाळ्याच्या प्रश्न असलेल्या शादीखाना वास्तू उभारण्यासाठी ५ कोटी असा एकून ३६ कोटींचा निधी राज्य शासनाने मंजूर केला आहे उपरोक्त तिन्ही प्रकल्पासाठी राज्याचे अर्थमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार , लातूर चे पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर आणि मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक अभिमन्यू पवार यांनी विशेष प्रयत्न करून वेळो वेळी पाठपुरावा केला होता परिणामी मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी लातूरकरांच्या या तिन्ही मागण्या निकाली काढून त्या साठी भरीव आर्थिक तरतूद केली आहे त्या बद्दल मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस,अर्थमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार , लातूर चे पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर आणि मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक अभिमन्यू पवार यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे .
मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर,
Add करा 9333333548 हा आमचा नंबर
No comments:
Post a Comment