बाळापुर पोलीसांचा धाक संपला
हिंगोली / प्रतिनिधी
दारू, मटका, जुगार यासह अवैध धंद्यात नावलौकिक मिळविलेले आखाडा बाळापुर पोलीस ठाणे नेहमीच चर्चेत राहिले आहे. बाळापुर पोलीस हे धंदे रोखण्यात अपयशी झाल्याने आयजीच्या पथकाने दोन वेळेस मटका बुक्कीवर छापा टाकून बाळापुर पोलीसांची कानउघडणी केली होती. पण अवैध धंद्याने हात काळे झालेल्या बाळापुर पोलीसांनी यातून कोणताच शहाणपणा घेतला नाही. याचाच अनुभव 10 जुलै रोजी आला असून कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापुर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या दांडेगाव येथील हॉटेलमध्ये जुगार अड्डयावर धाड टाकण्यासाठी गेलेल्या पोलीस अधिकारी अंकूश शेळके यांना जुगाऱ्यांनी चक्क लाथा-बुक्यांनी मारहाण करून खाकीचे धिंडवडे काढले आहेत.
खरतर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवून सर्व सामान्यांना न्याय मिळवून देणे तसे पोलीसांचेच काम पण बाळापुर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या एका घटनमुळे जिल्ह्यात पोलीसच सुरक्षित नाहीत. याची प्रचिती आली आखाडा बाळापुर पोलीस ठाण्याअंतर्गत रामेश्वर तांडा चौकीपासून जवळच असलेले दाटेगाव येथे हॉटेलमध्ये जुगार सुरू असल्याची माहिती पोलीसांना समजली. त्यानंतर 10 जुलै रोजी सायंकाळी 5.50 वाजता या हॉटेलवर छापा मारण्यासाठी पोलीस नाईक अंकूश शेळके गेले होते. यामध्ये शेळके व जुगाऱ्यांत शाब्दीक चकमक होवून वाद हाणामारीपर्यंत जावून पोहोचला. पोलीसांच्या आशिर्वादाने मुजोर झालेल्या जुगाऱ्यांच्या टोळक्यांनी चक्क पोलीस नाईक अंकूश शेळके यांना लाथा-बुक्यांनी मारहाण करून अश्लिल भाषेत शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. ही माहिती कळताच एपीआय ओमप्रकाश चिंचोळकर यांनी पीएसआय तानाजी चेरले, सविता बोधनकर, जमादार संजय मार्के, गजानन भालेराव या फौजफाट्यासह घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणातील आरोपी अशोक साळुंके, शिवपालसिंग ठाकुर, शंकर चांदीवाले, पंडीत दवणे, अमरदास बळवंते, चांदु बळवंते सर्व रा. दांडेगाव तर इतर चार ते पाच आरोपींचे नावे अद्याप पोलीसांच्या हाती लागले नाही. आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून पोलीस नाईक अंकूश शेळके यांच्या फिर्यादीवरून आरोपीविरूद्ध शासकीय कामात अडथळा निर्माण केला म्हणून बाळापुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, अवैध धंद्यामुळे बाळापुर पोलीस नेहमीच चर्चेत राहिले आहे. यापुर्वी आयजीच्या सुचनेनुसार लातूर जिल्ह्यातील अहमदपुर पोलीसांनी मटका बुक्कीवर धाड टाकली होती. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अवैध धंदे बंद करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी केलेल्या आंदोलनातही बाळापुर पोलीस ठाण्याचा पहिला क्रमांक होता. तरी सुद्धा पोलीसांच्या कामगिरीत काहीच सुधारणा झाला नव्हती. त्यानंतर अवैध धंद्याने थैमाने घातल्याने बोल्डा येथील ग्रामस्थांनी चक्क पोलीस अधिक्षकांना एसपी साहेब अवैध धंदे तुम्ही बंद करता काय आम्ही बंद करू असा दम भरला होता. या घटनेची दखल घेत पुन्हा एकदा आयजीच्या पथकाने कंधार पोलीस स्थानकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक संदिप भारती यांच्या नेतृत्वाखाली छापा मारून बाळापुर पोलीसांना चपराक दिला होता. या सर्व घटना ताज्या असताना यातून शहाणपणा घेत बाळापुर पोलीस ठाण्याच्या कारभाऱ्यांनी अवैध धंदे बंद करणे गरजेचे होते. पण आजतागत तरी तसे झालेले दिसत नाही. चक्क पोलीसांनाच झालेल्या मारहाणीमुळे बाळापुर पोलीसांचा धाक संपला की, काय अशी चर्चा आता सर्वत्र होताना दिसत आहे.

मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर,
Add करा 9333333548 हा आमचा नंबर
Add करा 9333333548 हा आमचा नंबर
No comments:
Post a Comment