खा राजीव सातव विरुद्ध भाजपकडून लढणार हे ?

Wednesday, July 11, 2018

हिंगोली लोकसभेसाठी भाजपचे 
शाम भारतीचे नाव चर्चेत
नांदेड / प्रतिनिधी
हिंगोली लोकसभेसाठी भाजपकडून माहूरगड येथील परमानंद दत्त आश्रमाचे शाम भारती यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. आमच्या प्रतिनिधीने प.पु. शाम भारती यांच्याशी संपर्क साधला असता होय मी हिंगोली लोकसभा मतदार संघासाठी काम करत असल्याचं सांगितलं. त्यांच वय वर्ष 52 असून एम.ए.इंग्रजी झालेले आहेत

हिंगोली लोकसभा मतदार संघात कॉंग्रेसचे खासदार सातव हे आहेत. त्यांना रोखण्यासाठी व हिंगोली लोकसभा मतदार संघातून भाजपा झेंडा फडकविण्यासाठी शाम भारती यांचे नाव आग्रही आहे. यांना उमेदवारी मिळणार या चर्चेने क्रेझ निर्माण झाली असून थेट दिल्लीहून यांची उमेदवारी निश्चित असल्याचे बोलले जात आहे. 

एकंदरीत हिंगोली लोकसभा मतदार संघातून कोणाला उमेदवारी मिळणार हे अद्याप अनिश्चित आहे. पण शाम भारती यांच्या नावाने मात्र धमाका निर्माण झाला आहे.

मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर, 
Add करा 9333333548 हा आमचा नंबर

No comments:

Post a Comment