रुग्णालयाच्या वैद्यकीय सेवा वारीचे 14 वे वर्ष असून मान्यवरांच्या उपस्थितीत शुभेच्छा देऊन पथक वारीच्या मार्गावर रवाना झाले .आषाढी एकादशीचा सोहळा आणि त्यापूर्वी आषाढी वारी ही महाराष्ट्राची शेकडो वर्षांची परंपरा आहे . ज्ञानेश्वर आणि तुकाराम महाराजांच्या पालख्या श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी दरवर्षी पंढरपूरला जातात .या पालख्यांसोबत लाखो वारकरी चालत -चालत पंढरपूरकडे येत असतात.
प्रवासादरम्यान चालण्यामुळे अनेकांना त्रास होतो . काही वारकऱ्यांना पूर्वी आजार असतो, त्यात भर पडते . अशावेळी या वारकऱ्यांना वैद्यकीय सेवेची गरज असते .हे ओळखून विवेकानंद रुग्णालयाच्या वतीने मागील 14 वर्षांपासून फिरते रुग्णसेवा केंद्र सुरू करण्यात आले आहे . आषाढी एकादशीपर्यंत हे फिरते वैद्यकीय रुग्ण सेवा केंद्र कार्यरत राहणार आहे. रुग्णालयाच्या वतीने व वैद्यकीय प्रतिनिधींच्या सहकार्याने दहा लाख रुपयांचे औषधी व साहित्य यासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे .
वैद्यकीय अधिकारी डॉ . मंगेश वळसंगकर ,डॉ . परमेश्वर फड ,परिचारक संगमेश्वर बरुरे ,महेश पंडगे , सोमनाथ बुरबुरे यांच्यासह चालक राजकुमार ठाकूर, सोपान गवंडगावे हे रवाना झाले आहेत .सोमनाथ बालवाड यांच्या नेतृत्वात हे वैद्यकीय पथक कार्यरत राहणार आहे शनिवार (दि .१४ )पासुन फलटण तालुक्यातील तरडगाव येथुन हे पथक सेवेत रुजु झाले आहे .
या पथकाला शुभेच्छा देण्यासाठी विवेकानंद वैद्यकीय प्रतिष्ठान व संशोधन केंद्राचे संस्थापक सदस्य डॉ . अशोकराव कुकडे ,प्रतिष्ठानच्या अध्यक्षा डॉ सौ .अरुणा देवधर, कार्यवाह अनिलराव अंधोरीकर, सहकार्यवाह डॉ . राधेश्याम कुलकर्णी ,डॉ . गौरी कुलकर्णी ,कर्मचारी व्यवस्थापक अजय कुलकर्णी , अनिल जवळेकर, महेश अंबुलगे ,सुरेंद्र देशपांडे ,हणमंत गुरमे ,श्रीनिवास नक्का , राजकुमार डांगे ,विशाल क्षिरसागर ,श्रीकांत पत्की यांच्यासह रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती
No comments:
Post a Comment