सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या निवडणुकांचे बिगुल वाजले असून प्रचाराच्या पहिल्याच टप्प्यात भाजपने आपल्यासर्व उमेदवारांची यादी जाहीर करून निवडणुक प्रचारात आघाडी घेतली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष मा. खा. रावसाहेबदानवेंच्या हस्ते रविवारपासून भाजपच्या निवडणुक प्रचाराचा शुभारंभ होत अाहे. रविवारी सायंकाळी प्रचाराचा शुभारंभकेल्यानंतर ते एका मेळाव्याला संबोधित करणार आहेत.
सांगली महापालिकेत पहिल्यांदाच स्वबळावर लढणाऱ्या भाजपच्या प्रचारासाठी बड्या नेत्यांच्या जाहीर सभांचे नियोजनकरण्यात आले आहे. शनिवारी राज्याचे महसुल, मदत व पुनर्वसन तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री मा. श्री. चंद्रकांतदादापाटील यांचा दौरा पार पडला असून रविवारी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे सांगली शहराच्या दौऱ्यावर येत आहेत.सायंकाळी साडेपाचच्या सुमारास त्यांचे शहरात आगमन होणार असून सांगलीचे ग्रामदैवत असलेल्या गणपती मंदीर येथे तेभाजपच्या प्रचाराचा शुभारंभ करणार आहेत. यावेळी सांगलीचे पालकमंत्री सुभाष देशमुख, खासदार अमर साबळे, खासदारसंजयकाका पाटील यांच्यासह स्थानिक आमदार सुधीरदादा गाडगीळ तसेच आमदार सुरेशभाऊ खाडे आदी प्रमुख नेत्यांचीउपस्थिती असणार आहे. त्यानंतर टिळक स्मारक येथे भव्य कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून यामेळाव्याला ते संबोधित करणार आहेत.
No comments:
Post a Comment