कै.डाॅ.शंकरराव चव्हाण जयंती निमित्त सौ.वर्षाताई भोसीकर यांच्या हस्ते शालेय साहित्यचे वाटप व वृक्षारोपण

Sunday, July 15, 2018

कंधार दि 14 जुलै (प्रतिनिधी)
देशाचे माजी केंद्रीयगृहमंत्री व मराठवाडयाचे भाग्यविधाते कै. डाॅ.शंकरराव चव्हाण यांच्या जयंती निमित्त जिल्हा परिषद प्रा.शा.लाठ (खु) ता.कंधार येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊचे वाटप जिल्हा काँग्रेसचे कमिटीचे सरचिटणीस संजय भोसीकर व माजी जिल्हा परिषद सदस्या सौ.वर्षाताई भोसीकर यांच्या वतीने शाळेतील विद्यार्थ्यांना करण्यात येऊन शाळा परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.

शालेय समितीचे अध्यक्ष बालाजी पाटील इंगोले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच सौ.चऊत्राबाई जाधव, हणमंतराव पेठकर, उपसरपंच रणजीत घोरबांड,देवीदास पाटील इंगोले, वसंतराव घोरबांड,सुबानराव जाधव,अवुधुत इंगोले मु.अ.डी.जी. गादेवार,संतोष गजभारे,माधव जाधव,सहशिक्षक एस.ए.सोनवळे,बंडू पाटील इंगोले विठल पाटील इंगोले आदींची उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या प्रारंभी डाॅ.शंकरराव चव्हाण यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी शालेय समितीच्या वतीने मान्यवरांचे शाल हार व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.या वेळी बोलताना संजय भोसीकर म्हनाले की कै.शंकरराव चव्हाण हे मराठवाड्यासाठी आधुनिक भगीरथ होते. त्याच्या उल्लेख जलतज्ञ म्हणून केला जातो.त्यानी जायकवाडी, विष्णूपूरी ,सारखे अनेक महत्त्वाचे जलसिंचन व पिण्याच्या पाण्यासाठी प्रकल्प उभारले.त्यांचे कार्य सदैव प्रेरणादायी ठरले आहे.

सौ.वर्षाताई भोसीकर यांनी डाॅ.चव्हाण यांच्या जीवन चरीत्रावर प्रकाश टाकून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना म्हणाल्या की कठोर परिश्रम करून यश संपादन करावे .शिक्षकांनी नियमीत शाळेमध्ये पालक मेळावे घेउन शिक्षक,पालक व विध्यार्थ्या मधे सुसंवाद घडवून आणावा व विद्यर्थियाना आधुनिक तंत्रज्ञाना चे शिक्षण देऊन आपल्या गावातील भावी पीढी सुसंस्कृत बनवावी.कार्यक्रमा चे प्रास्ताविक देवीदास पाटील इंगोले यांनी केले.

शाळेच्या प्रांगणात या प्रसंगी प्रमुख पाहुण्याच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षक एस.ए. सोनवळे यांनी केले तर आभार प्रदर्शन मु.अ.बी.जी.गादेवार, यांनी केले. 
या प्रसंगी शाळेतील विद्यार्थी शिक्षक पालक व गावातील नागरिकांची मोठया प्रमाणावर उपस्थिती होती

No comments:

Post a Comment