अाई राजा उदोच्या जयघोषात भवानीमातेचे दर्शन नगरपालिकेकडुन मानाचे स्वागत
तुळजापुर दि १४ वार्ताहर
श्री. संत गजानन महाराज शेगाव पालखीचे तुळजापूर शहरात हजारो नागरिकांच्या उपस्थितीत आगमन झाले. प्रभारी नागराध्यक्ष चंद्रकांत कणे यांच्या हस्ते पालखीचे व मूर्तीचे पुजन करण्यात आले.
दुपारी चार वाजता गजानन महाराज यांची पालखी उस्मानाबाद रोडवरील बापुसाहेब कने यांच्या घरासमोर अाली तेव्हा नगराच्यावतीने नगराध्यक्ष बापुसाहेब उर्फ चंद्रकांत कने यांनी मानाचे स्वागत केले.त्याप्रसंगी नगरसेवक विजय कंदले, पंडितराव जगदाळे, किशोर साठे, आशाताई पलंगे, राहुल खपले, नगरसेवक तसेच अानंद कंदले, संदीप गंगणे, विशाल भय्या रोचकरी,अमर चोपदार, रत्नदीप भोसले, अभिजित कदम, नानासाहेब लोंढे, अप्पासाहेब पवार, विनोद पलंगे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि भारत साळुंके, मुजाफर शेख, सज्जन गायकवाड, दत्ता साळुंके, देविदास देवकते, रंगनाथ हंगारगेकर, विश्वास मोठे, विशाल अमृतराव .ए. बी. गायकवाड, .महादेव शिंदे. न.प.कर्मचारी उपस्थित होते. शहरात अनेक ठिकाणी पाखखीतील भक्तांना अल्पोपहार व इतर साहित्याचे वितरण स्वयंसेवी संस्थांनी केले
ही पालखी तुळजाभवानी मंदिरात पोचल्यानंतरसर्व मानकरी व भक्तांनी देवीचे दर्शन घेतले. लोहीया मंगलकार्यालय येथे सर्व पालखीतील भक्तांची राहण्याची व भोजनाची सोय येथील पेशवे परिवाराच्यावतीने प्रतिवर्षाप्रमाणे करण्यात अाली.
No comments:
Post a Comment