हिंगोली/ प्रतिनिधी
हिंगोली तालुक्यातील वडद येथील रहिवासी असलेली सहा वर्षीय वैष्णवी विजय डांगे आज सकाळी घरासमोर खेळत होती. अचानक विंचवाने डंक मारला. त्या नंतर त्या चिमुकलीने टाहो फोडल्या नंतर आई- वडिलांनी धावा-धाव केली असता विंचवाणे दंश केल्याचे समजले. वैष्णवीला तात्काळ सामान्य रुग्णालय हिंगोली येथे भरती करण्यात आले. डॉक्टरांनी तिला वाचवण्याचे आटोकाट प्रयत्न केले पण दुर्दैवाने त्या चिमुकलीचा उपचारा दरम्यान मृत्यु झाल्याची दुःखद घटना घडली.
No comments:
Post a Comment