टाकळगव्हाणच्या सरपंचाचे पद रद्द करण्याचा प्रस्ताव रेती घाट तपासणी अहवाल प्रकरण, एसडीएम खेडेकरांचा दणका

Friday, July 13, 2018

हिंगोली / प्रतिनिधी 

औंढा नागनाथ तालुक्यातील टाकळगव्हाण येथील सरपंचाने रेती घाट तपासणी अहवालात कसूर केल्याचा ठपका ठेवत वसमतचे प्रभारी उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर यांनी त्यांचे पद रद्द करण्याबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव दि. 13 जुलै रोजी पाठविल्यामुळे खळबळ उडाली आहे. या प्रस्तावावर जिल्हाधिकारी काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागल आहे. 
औंढा नागनाथ तालुक्यातील टाकळगव्हाण येथील रेती घाट तपासणी अहवाल ग्रामपंचायत कार्यालयाकडून पाठविण्यात आला नव्हता. ग्रामपंचायतीचे सरपंच हे ग्रामदक्षता समितीचे अध्यक्ष असल्यामुळे अवैध उत्खनन रोखणे, हे तहसीलदार व जिल्हाधिकारी यांच्या निदर्शनास आणून देणे, ग्रामदक्षता समितीचे अध्यक्ष व समितीचे कर्तव्य आहे. ग्रामदक्षता समितीचे अध्यक्ष तथा सरपंच यांनी ग्रामदक्षता समितीची एकही बैठक घेतली नाही.

 तसेच कुठलाही अहवाल त्यांनी तहसील कार्यालय, उपविभागीय कार्यालयास सादर केला नसल्याने त्यांनी सदर कर्तव्य पार पाडण्यात प्रथमदर्शनी कसूर केल्याची दिसून येत असल्याचे अहवालात नमुद करण्यात आले आहे. मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 39 नुसार सरपंच यांनी कर्तव्य पार पाडण्यास असमर्थ असल्याबद्दल दोषी असेल किंवा कर्तव्य पार पाडण्यात दुराग्रहाने हेळसांड करीत असेल तर अशा सदस्यास किंवा सरपंच, उपसरपंचास अधिकार पदावरून काढून टाकता येते तोच आधार घेत एसडीएम प्रशांत खेडेकर यांनी दि. 13 जुलै रोजी जिल्हाधिकाऱ्यांना टाकळगव्हाण येथील सरपंचाचे पद रद्द करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविल्यामुळे खळबळ उडाली आहे. 

 या प्रस्तावावर जिल्हाधिकारी काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागले आहे. दरम्यान, टाकळगव्हाणच्या सरपंचाने नाव अहवालामध्ये नमुद नसल्याने समजु शकले नाही.

मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर, 
Add करा 9333333548 हा आमचा नंबर

No comments:

Post a Comment